घरCORONA UPDATEकरोनामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय - शरद पवार

करोनामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय – शरद पवार

Subscribe

शरद पवार यांनी ठाकरे सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही विशेष कौतुक केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी ठाकरे सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही विशेष कौतुक केले. तसेच नागरिकांना सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. करोनामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. त्यामुळे त्यांना पीक कर्जाची परतफेड शक्य नाही. सरकारने पीक कर्जाचे पुढील चार ते पाच वर्षांसाठी हफ्ते पाडून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली.

शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना मोफत धान्य देताना शेतकऱ्यांकडे असलेला शेतमाल विकत घेण्याबाबत विचार करावा. शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला यामुळे मोठा फटका बसला आहे, असेही पवार म्हणाले. करोनाचा मानवासह पशु- पक्ष्यांवरही परिणाम झाला आहे. सरकार याबाबत काही सूचना देत आहे. सरकारच काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या सरकारच्या सुचनांकडे दुर्लक्ष कराल तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

मालकांनी कामगारांना जपावं

जेवढ्या कंपन्यात कामगार काम करतात, त्या कंपनी मालकांनी कामगारांना जपावं, त्यांच्या वेतनाची खबरदारी घ्यावी, करोनाशी लढण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एका महिन्याचा वेतन देणार असल्याचे देखील पवारांनी घोषित केले.

द्राक्ष व आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी

करोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतर राष्ट्रीय संघटना यांची अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडवू नका. संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सर्व शक्ती वापरा. द्राक्ष व आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी. ईएमआयबाबत सरकारने विचार करावा. फळबागांच्या नुकसानीकडे लक्ष दिले गेलं पाहिजे, असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -