घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांची राजकीय तिरडी तयार, फक्त हे राम म्हणणं बाकी; राऊतांचा...

मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांची राजकीय तिरडी तयार, फक्त हे राम म्हणणं बाकी; राऊतांचा घणाघात

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य 15 आमदार अपात्र ठरतील. हे नक्की. याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांसह अन्य 15 आमदारांची राजकीय तिरडी बांधली आहे. फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे. हे स्पष्ट सांगतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य 15 आमदार अपात्र ठरतील. हे नक्की. याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांसह अन्य 15 आमदारांची राजकीय तिरडी बांधली आहे. फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे. हे स्पष्ट सांगतो. मुडद्यात कितीही जान फुंकण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी विज्ञान आणि कायद्याला मर्यादा आहे. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. नाही तर संसदीय इतिहासात विधानसभा अध्यक्षांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल, हे त्यांनाही माहिती आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते माध्यमांशी संवाद साधत होते. (The sixteen MLAs along with the Chief Minister eknath shinde will disqualified Thackeray group leader Sanjay Raut s attack )

शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या 16 आमदारांचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना या आमदारांबाबत निर्णय घेण्याची डेडलाईन दिली आहे. तसंच विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात वेळकाढूपणा केल्याचेही ताशेरे ओढले आहेत.त्यामुळे येत्या दोन आठवड्यात या प्रकरणावर निकाल येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी मोठं विधान करत विधानसभा अध्यक्षांसह बंड केलेल्या 16 आमदारांवर घणाघात केला आहे.

- Advertisement -

फसवणुकीतून तयार झालेलं सरकार 

दोन्ही पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील फुटलेले सर्व आमदार, खासदार हे केवळ भीतीपोटी गेले आहेत. राज्यातील हे सरकार फसवणुकीनं तयार झालं आहे. पैसे मिळाले असतील पण इतर आश्वासने पूर्ण झाली नाही. दोन्ही पक्षातील 100 टक्के आमदार ईडी, सीबीआय, भीती आणि पैसे या मोहापायी आणि भीतीतून पळाले आहेत, असा दावा राऊतांनी केला आहे.

(हेही वाचा: Women Reservation Bill : काही पुरुष नेते निवडून न येण्यासाठी विधेयक आणलं असावं; राऊतांची खोचक टीका )

- Advertisement -

पुरुष नेते निवडून न येण्यासाठी हे विधेयक

संजय राऊत म्हणाले की, अमित शाह काल खोचकपणे म्हणाले की, उद्या जर का वायनाडची सीट महिला आरक्षित झाली तर त्याचाही आरोप तुम्ही आमच्यावर कराल. पण ते खरंच आहे. ते काहीही करु शकतात. त्यांच्या हातात निवडणूक आयोग आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. राऊत म्हणाले की, विधिमंडळात असलेले अनेक पुरुष नेते पुन्हा सभागृहात दिसू नयेत, म्हणूनही हे विधेयक घाईघाईत भाजपनं आणलं असावं, अशी उपरोधिक टीकाही राऊतांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -