घरमहाराष्ट्रविविध मान्यवरांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'सोसायटी अचिवर्स पुरस्कार' प्रदान

विविध मान्यवरांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ प्रदान

Subscribe

मुंबई : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ गायिका मीनाताई खडीकर, अभिनेत्री हेमामालिनी, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेता अनुपम खेर, सोनू सूद, सिद्धार्थ मल्होत्रा आदी मान्यवरांसह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अमृता फडणवीस यांना सोसायटी अचिव्हर्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

सांतक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये रविवारी हा पुरस्कार सोहळा झाला. यावेळी मॅग्ना प्रकाशन समूहाचे अध्यक्ष नारी हिरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यासह मुंबईत 2 लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या चार महिन्यात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

- Advertisement -

समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम ही संस्था अनेक दशके करीत आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून लाखो वाचकांना प्रेरणा देण्याचा सोसायटी मासिकाचा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण सर्व मिळून मुंबई आणि महाराष्ट्राला अधिक सर्वोत्तम बनवूया, असे आवाहन त्यांनी केले. विविध क्षेत्रात राज्याचं आणि देशाचं नाव उज्वल करणाऱ्या मान्यवरांचा आज गौरव झाला आहे. सोसायटी मासिकाने सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार सुरू केल्यास तो घ्यायला आम्ही नक्की येऊ, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -