घरताज्या घडामोडीEntrance Exam: NEPमध्ये प्रवेश परीक्षांसाठी तोडगा, अशी असेल नवी पद्धत

Entrance Exam: NEPमध्ये प्रवेश परीक्षांसाठी तोडगा, अशी असेल नवी पद्धत

Subscribe

मागील काही वर्षांत नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यामध्ये केंद्रीय विद्यापीठांसह सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांमध्ये शेकडो प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक भारासह वेळही वाया जातो. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी NEPमध्ये राष्ट्रीय स्तरावर एकच प्रवेश परीक्षा घेण्याबाबत सुचविण्यात आलं आहे. तसेच यामध्ये काही नवीन पद्धती देखील असणार आहेत.

शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार, विद्यापीठ प्रवेश परीक्षांची तत्त्वे एकसारखी असतील. त्यासाठी ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) घेईल. मात्र, या परीक्षेनुसार प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय संबंधित विद्यापीठं आणि महाविद्यालयांवर सोपविण्यात आला आहे.

- Advertisement -

एनटीए उच्च गुणवत्तेची सामान्य योग्यता चाचणी आणि विज्ञान मानव्यशास्त्र, भाषा, कला आणि व्यावसायिक विषयांमधील विशेषीकृत सामान्य विषय परीक्षा घेण्याचे काम करणार आहे.

अशी असेल नवी पद्धत

– परीक्षा देण्यासाठी विषयांची निवड करता येणार आहे.

– विद्यापीठ विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विषयांचा पोर्टपोलिओ पाहू शकेल.

– वैयक्तिक आवडी व प्रतिभा यांच्या आधारे प्रवेश देऊ शकेल.

– प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए स्वायत्त चाचणी संस्था म्हणून काम करेल.

काय फायदा होईल? 

शेकडो विद्यापीठांनी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्याऐवजी, या एका परीक्षेमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरचा भार मोठ्या प्रमाणात हलका होईल. त्यांच्या प्रवेशासाठी एनटीए मूल्यांकन वापरण्याबाबतचा निर्णय विद्यापीठे आणि महाविद्यालयांवर सोडला जाईल, असेही धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : वर्ष लोटले प्रशासन कधी जागे होणार?; स्व. श्रीकांत ठाकरे तरण तलावाची दुरुस्ती संपेना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -