घरताज्या घडामोडीराज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च पर्यंत होणार

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च पर्यंत होणार

Subscribe

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घमसान; भाजपचा बैठकीतून वॉकआऊट

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात आला. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च पर्यंत होणार, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कामकाज चालवणार आहेत.

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीचं नियोजन करण्यात आलं. १ मार्चपासून अधिवेशन सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं अभिभाषण होईल. त्याच दिवशी पूरवणी मागण्या सादर केल्या जातील. त्यानंतर २ तारखेलाराज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल. ३ आणि ४ तारखेला पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल आणि पुरवण्या मागण्या मंजूर होतील. ५ मार्चला विरोधी पक्षाचा प्रस्ताव होईल. बिलं सादर केली जातील. शासकीय कामकाज होईल. ६ आणि ७ मार्चला सुट्टी असणार आहे. ८ मार्चला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यानंतर ९ आणि १० मार्चला अर्थसंकल्पावर चर्चा होऊन विनियोजन बिल पास होईल आणि अधिवेशन संपेल.

- Advertisement -

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घमसान

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घमसान झालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली. या वादानंतर विरोधी पक्ष बैठकीतून बाहेर निघाला. संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनावेळी कोरोना दिसत नाही, अधिवेशनाच्यावेळी कोरोना दिसतो का? असा सवाल भाजपने केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -