घरताज्या घडामोडीराज्य सफाई आयोग सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध: मुकेश सारवान

राज्य सफाई आयोग सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध: मुकेश सारवान

Subscribe

राज्य सफाई आयोग सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होत असल्यास त्यांनी थेट आयोगाकडे संपर्क साधावा,असे आवाहन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी केले.

राज्य सफाई आयोग सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होत असल्यास त्यांनी थेट आयोगाकडे संपर्क साधावा,असे आवाहन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष मुकेश सारवान यांनी केले. गुरुवारी (ता.१२) राज्य सफाई आयोगाचे उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष मुकेश सारवान यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेला भेट देऊन नगर परिषद सभागृहात आयोजित बैठकीत येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष प्रियेश जाधव, शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, मुख्याधिकारी प्रकाश बोरसे व इतर अधिकारी उपस्थित होते.

नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना लाड व पागे समितीच्या शिफारशी प्रमाणे सवलती देण्यात येत आहेत.कर्मचाऱ्यांना दरवर्षी गणवेष आणि दर महिन्याला वेळेवर वेतन दिले जाते हि समाधानाची बाब असल्याचे मुकेश सारवान यांनी सांगितले. त्यातूनही सफाई कर्मचाऱ्यांवर कुठे अन्याय होत असेल, काही अडचणी असतील तर त्यांनी आवाज उठवावा आयोग त्यांच्या पाठीशी नक्कीच असेल असे मुकेश सारवान यांनी यावेळी सांगितले. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता समस्या असल्यास थेट आयोगाशी संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

सफाई कर्मचाऱ्यांना घाण धुलाई भत्ता म्हणून दरमहा ३५० रुपये देण्याची सूचना नगर परिषद प्रशासनाला केली असल्याचे सारवान यांनी सांगितले. तर श्रमसाफल्य योजनेंतर्गत १६ कर्मचाऱ्यांना बीएसयूपीची घरकुले देण्यात आली असून १५ कर्मचाऱ्यांना घरकुले देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली.त्याचप्रमाणे सारवान यांनी केलेल्या सूचनेनुसार कर्मचारी निवासस्थाना जवळ समाज मंदिर उभारण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकार्यांनी सांगितले. राज्य सफाई आयोगाचे प्रभारी अध्यक्षांनी प्रथम आपला सत्कार न स्विकारता ज्येष्ठ महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला मग नगर परिषदेतर्फे सत्कार स्वीकारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -