घरCORONA UPDATEमद्यविक्रीतून राज्य सरकारला २१०० कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा 

मद्यविक्रीतून राज्य सरकारला २१०० कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा 

Subscribe

राज्यात सध्या ८ हजार दुकानांमध्ये मद्यविक्री सुरु झाली असून, महिन्याभरात राज्य सरकारला मद्यविक्रीतून २१०० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

राज्यात सध्या लॉकडाऊन असल्याने मोठ्या प्रमाणात सरकारी तिजोरीत येणाऱ्या महसूलामध्ये घट झाली आहे. यामुळेच राज्य सरकारने वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यात सध्या ८ हजार दुकानांमध्ये मद्यविक्री सुरु झाली असून, महिन्याभरात राज्य सरकारला मद्यविक्रीतून २१०० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. दरम्यान राज्यात देशी दारुची ३ हजार ३२७ आणि विदेशी दारूची १ हजार ३४८ दुकाने तर ३ हजार ४६३ वाईन शॉप सुरु झाली आहेत. त्यामुळे यातून राज्याला दररोज ८० कोटींच्या महसुलाची अपेक्षा आहे.

दारूसाठी अजूनही वाईन शॉप बाहेर रांगा

दरम्यान राज्य सरकारने  काही भागांमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच तळीरामाची वाईन शॉप बाहेर गर्दी पाहायला मिळाली होती. मंगळवारी देखील काही वाईन शॉप बाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाईन शॉप बाहेर अनेक ठिकाणी मोठी गर्दी जमल्याने सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये तर रेड झोन असताना देखील नागरिक रस्त्यावर दिसत होते.

- Advertisement -

दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन आहे. याचमुळे राज्यातील उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत राज्याला महसूल मिळवून देणारे वाईन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल हे बघायला काय हरकत आहे? असे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लिहिले होते. तसेच या पत्रामध्ये त्यांनी वाईन शॉप्ससोबतच हॉटेल, खानावळी देखील सुरू करण्याची मागणी देखील केली होती. राज्याच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घ्यावाच लागेल, असे त्यांनी नमूद केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -