राज्य सरकारकडे असणार तुमची सर्व माहिती, प्रत्येक कुटुंबाला मिळणार एक ओळखपत्र

या परिवार पहचान पत्र योजनेचे संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करण्यात आली असून या योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई | येत्या काही महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) राज्यातील सर्व कुटुंबांसाठी ‘परिवार पहचान पत्र’ ( Parivar Pehchan Patra) देण्याचा विचार करत आहेत. यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाची आणि व्यक्तीची संपूर्ण माहिती सरकारकडे असल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ कुटुंबांना सहज मिळू शिकेल. ही योजना हरियाणाच्या (Haryana) परिवार पेहचान पत्रच्या धर्तीवर महाराष्ट्रात (Maharashtra) राबवण्यात येणार आहे.

या परिवार पहचान पत्र योजनेचे संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेल्या अहवालानंतर मंत्रिमंडळ येत्या महिन्यात ही योजना आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ओळखपत्रावर कुटुंबातील सर्व सदस्यांची संपूर्ण माहिती असेल. यामुळे राज्यातील नागरिक सरकारपासून कोणतीही माहिती लपवू शकत नाही. यात कुटुंबांशी संबंधित डेटासह युनिव्हर्सल डेटाचा समावेश असणार आहे. या योजनेत ३० दशलक्षाहून अधिक कुटुंबांचा डेटा गोळा करण्याची अपेक्षित आहेत.

योजनेचा असा होणार फायदा

या योजनेमुळे राज्यातील नागरिकांची माहिती एका ठिकाणीच मिळणार आहे. या ओळखपत्रात कुटुंबाच्या सर्व सदस्यांची नावे, त्यांचे वय, शिक्षण, जात, राशन कार्ड, पॅन कार्ड, घर, संपत्ती, शेती विषयक माहिती, आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, बँकेशी संबंधित माहिती, उत्पन्नाची माहिती, करदाते आहेत की नाही, मोटार-कार, उत्पन्नाची संपूर्ण माहिती आणि सरकारी सुविधांचा लाभ घेतला आहे की नाही, ही सर्व माहिती त्यात असणार आहे.

या ओळखपत्र असेल तर, सर्वसामान्यांना सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. सर्वसामान्य सरकारपासून काहीही लपवू शकणार नाही आणि सरकार सुविधासाठी पात्र असलेल्या कुटुंबाना सुविधा घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही