घरताज्या घडामोडीराज्य सरकारला बदल्या, पदोन्नत्या अन पैसे खाण्यातच स्वारस्य

राज्य सरकारला बदल्या, पदोन्नत्या अन पैसे खाण्यातच स्वारस्य

Subscribe

भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांची टिका

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. चिंता करण्याच्या पलिकडे ही परिस्थिती गेल्याचं नजिकच्या काही घटनांवरून दिसून येते. परंतु राज्याचं गृहखाते सांभाळणारे केवळ बदल्या, पदोन्नत्या अन पैसे खाण्यातच धन्यता मानत आहे. राज्यातील अधिकारयांच मनोबल खच्चीकरणाचं काम या सरकारकडून होत आहे अशी टिका भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली. नाशिक येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी महाजन यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यु प्रकरणी संशय व्यक्त करतांना या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एनआयए कडे तपास देण्याची मागणी केली. जगातील दहा श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा आहे. स्फोटकांची गाडी सापडलेल्या गाडीमालक हिरेनला सुरक्षा द्या ही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मागणी केली होती. पण दुपारी त्यांचा मृतदेह सापडला, जर त्यांना वेळीच सुरक्षा दिली असती तर हा प्रकार घडला नसता असे सांगत त्यांनी वाझे यांच्या प्रत्येक हालचाली संशयास्पद असल्याची टिकाही केली. घटनेनंतर वाझे सगळयात आधी पोहचले. त्यांनाच चौकशी अधिकारी नमेले, आश्चर्य म्हणजे सचिन वाझे यांच गाडी मालकाशी संभाषणही झाले होते. कशासाठी त्यांनी गाडी मालकाशी संभाषण केले असा प्रश्नही यावेळी महाजन यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. राज्यात सत्ता असतांना नाशिकच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर केला गेला परंतु सत्ता बदल झाल्यानंतर केवळ महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने विकासकामांच्या निधीसाठी राज्य सरकारकडून भेदभाव होत आहे.मात्र केंद्र सरकारकडून निधी आणून कामं पूर्ण केली जातील असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना उद्या एमआयएम सोबतही युती करेल
शिवसेनेने नाशिक महापालिकेत शंभर प्लसचा नारा दिला आहे याबाबत महाजन यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेवर सडकून टिका केली. निवडणुकांच्यावेळी त्यांनी असेच काही तरी सांगितले होते काय झाले हे सर्वांसमोर आहे. उत्तर महाराष्ट्रात चार महापालिकांमध्ये काय स्थिती आहे  हे त्यांनी पहावं. काल परवा गुजरात निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले. बिहार निवडणुकांमध्ये तर त्यांच्या उमेदवारांना डिपॉझिट वाचवता आलं नाही. आता पश्चिम बंगालमध्ये बॅनर्जी यांना पाठींबा दिला आहे. परंतु भाजपाला त्याचा काहीएक फरक पडत नाही. कितीही पक्ष एकत्र आले तरी, सत्ता आमच्याकडेच राहील. नाशिक महापालिकेतही भाजपचीच सत्ता येईल असे सांगतानाच शिवेसेनेने सत्तेसाठी आपले विचार गुंडाळून ठेवले आहेत. उद्या शिवसेना एमआयएमसोबतही युती करेल अशी टिकाही त्यांनी केली.

- Advertisement -

काय म्हणाले महाजन…

  • नाशिकच्या विकासासाठी सत्ता काळात भरघोस निधी दिला
  • राज्यात सरकार नसल्याने विकासकामांच्या निधीबाबत अडवणूक होतेयं.
  • केंद्र सरकार, महापालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देवू.
  • राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते.
  • आगामी निवडणुकीसाठी मनसेकडून कोणताही प्रस्ताव नाही.
  • राम मंदिराच्या नावाखाली भाजप वर्गणी गोळा करत नाही.
  • विश्व हिंदू परिषद, रामजन्मभुमी न्यासला मदत करत आहोत.
  • इतर पक्षांसारखं भाजपात खंडण्या गोळा केल्या जात नाही.
  • अयोध्येत राम मंदिराचं निर्माण कार्य ही अभिमानाची बाब.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -