घरताज्या घडामोडीअत्यावश्यक सेवेची एसटीकडून अपेक्षा, कामगारांना पगारासाठी २ महिने उपेक्षाच!

अत्यावश्यक सेवेची एसटीकडून अपेक्षा, कामगारांना पगारासाठी २ महिने उपेक्षाच!

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांसाठी  ९८ हजार  कर्मचाऱ्यांना गेले दोन महिन्यापासून वेतन नाही. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ९८ हजार  कर्मचाऱ्यांना गेले दोन महिन्यापासून वेतन नाही.  मे महिण्यातअर्धे तसेच जुन मध्यें काहीच वेतन मिळाले नसून त्या करिता राज्य सरकारने तात्काळ निधी द्यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे  सरचिटणीस श्रीरंग बरगे यानी गुरुवारी  निवेदनाद्वारे राज्यसरकार कडे केली आहे.

काय आहे निवेदन 

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात ७५ टक्के, मे महिन्यात ५० टक्के इतके वेतन मिळाले असून जून महिन्यात काहीही वेतन मिळालेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना मुळातच वेतन कमी आहे. व एवढ्या तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होऊन बसले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर त्यांची उपासमार सुद्धा होऊ शकते. लॉकडाऊन कालावधीत सर्वच क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याचे शासनाने निर्देश असतांना सुद्धा एसटी मध्ये मात्र कर्मचाऱ्यांना अपूर्ण वेतन मिळत आहे. शिवाय वेतन वेळेवर मिळत नाही, लॉकडाउन असल्याने मुंबई, ठाणे, व पालघर मध्ये तसेच जिल्हा अंतर्गत काही प्रमाणात वाहतूक चालू असून १६००० नियतांपैकी फक्त अंदाजे १८०० नियते चालू आहेत. उत्पन्न नसल्याने एसटीची आर्थिक परिस्थिती खालावली असून कर्मचाऱ्यांना पूर्ण व वेळेवर वेतन मिळण्यात अडचणी येत आहेत. एसटीची आर्थिक परिस्थिती पाहता एसटीला राज्य सरकारने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. असेही  निवेदनात म्हंटले आहें.यासंदर्भात महामंडळाने सुद्धा राज्य सरकारकडे आर्थिक मदत मिळावी म्हणून मागणी केली असून तात्काळ एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. असेही निवेदनात म्हंटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

एसटीला आर्थिकदृष्टया सक्षम करा

एसटी महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. लॉकडाऊन काळात एसटीला २ हजार ५०० कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटीकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी रक्कम उपलब्ध नाही. एसटी महामंडळातील कर्मचा-यांचे वेतन अदा करणे, डिझेल खर्च व इतर खर्च भागविणे अत्यंत अवघड झालेले आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट करून सर्वसामान्य जनतेला किफायतशीर दरात वाहतूक व्यवस्था व दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध प्रकारे अर्थसहाय्य करण्यासह शासनाकडून अनुदान देऊन आर्थिकदृष्टया सक्षम करावी,अशी मागणी श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -