घरमहाराष्ट्रउपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली पंढरपुरात विठ्ठल - रुक्मिणीची शासकीय महापूजा

उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली पंढरपुरात विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा

Subscribe

औरंगाबाद मधील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील गावी राहणारे उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे यांना पूजेचा मान मिळाला.

कार्तिकी एकादशी निमित्त आज पंढरपुरात अनेक भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अशातच कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. तर यावर्षी मनाचे वारकरी म्ह्णून औरंगाबाद मधील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील गावी राहणारे उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे यांना पूजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठ्लाच्या नामाने सर्वत्र मंगल आणि भक्तिमय वातावरण झाले आहे. कार्तिकी एकादशी निमित आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रक्मिणीची महापूजा केली. यावेळी विठुरायाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर मंत्रोपचाराने विठूरायाची यथासांग पूजा संपन्न झाली. मागील 50 वर्षे वारी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील माधवराव साळुंखे दाम्पत्याला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला. माधवराव साळुंखे हे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झाले असून मागील 50 वर्ष ते पंढरीची वारी करीत आहेत.

- Advertisement -

‘मंदिर 2023’ डायरीचे प्रकशन
पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर ‘मंदिर 2023’ डायरी चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्याचोबत विठ्ठल रुक्मिणी यांच्या अलंकारांच्या अल्बमचेही प्रकाशन झाले. रात्री बारा वाजता विठुरायाच्या नित्यपूजेसदेखील सुरुवात झाली. यानंतर विठ्ठलाची पाद्यपूजा करण्यात आली. या पूजेवेळी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. विठ्ठलाची महापुजा संपन्न झाल्यानंतर दर्शन पुन्हा सुरु करण्यात आले.

- Advertisement -

पंढरपूर – घुमान सायकल वारीला उपमुख्यमंत्र्यांकडून झेंडा दाखविण्यात आला
संत नामदेवांनी जगाला दिलेल्या समता आणि बंधुता याला उजाळा देण्यासाठी पंढरपूर ते घुमान निघालेल्या सायकल वारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. 75 वर्षाच्या भावे आज्जी यांनी देखील या सायकल वारीत सहभाग घेतला. त्या 2 हजार 300 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही सायकल वारी महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील स्नेह वाढवणारा ठरेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज पहाटे या सायकल वारीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी झेंडा दाखवल्यावर सुरुवात झाली. या सायकल वारीसाठी 105 सायकलस्वार सहभागी झाले आहेत. यात 90 जेष्ठ नागरिक तर 165 महिलांनी देखील सहभाग घेतला आहे. ही सायकल वारी सलग 22 दिवसांची असणार आहे. ही वारी घुमानमध्ये पोहोचल्यावर पंजाबचे राज्यपाल वारकऱ्यांचे स्वागत करणार आहेत.


हे ही वाचा –  तुम्ही आम्हाला देशप्रेम शिकवू नका, प्रणिती शिंदेंची संभाजी भिंडेंवर टीका 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -