घरउत्तर महाराष्ट्रशस्त्रास्त्र प्रदर्शनातून दिसणार भारतीय लष्कराची ताकद; १८ व १९ मार्च रोजी 'नो...

शस्त्रास्त्र प्रदर्शनातून दिसणार भारतीय लष्कराची ताकद; १८ व १९ मार्च रोजी ‘नो युवर आर्मी’ प्रदर्शन

Subscribe

नाशिक : देशाचा अमृत महोत्सवानिमित्त खासदार हेमंत गोडसे आणि युनायटेड वि स्टँड फाउंडेशनच्यावतीने गोल्फ क्लब मैदान येथे १८ व १९ मार्च रोजी सैन्य शस्त्रांचे प्रदर्शन आयोजी करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाची ताकद नाशिककरांना अनुभवता येणार आहे. केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता या शस्त्र प्रदर्शनाचे उदघाटन होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लष्कराचे कार्य कसे चालते यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. लष्कराचे शस्त्र यानिमित्ताने नागरिकांना जवळून पहायला मिळणार आहे. प्रदर्शनात विविध तोफा, शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकिय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, आर्मी रेकॉर्ड स्टॉल, रणगाडे, रायफल्स, रॉकेट लांउचर्स, इंडियन फिल्ड गन, बोफोर्स, धनुष, १०५ एमएम गन अशा विविध प्रकारचे संरक्षण साहित्य जवळून बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. १८ व १९ मार्च रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले असेल. तरूणांना सैनिकांशी संवाद साधण्याची संधीही यानिमित्ताने मिळणार आहे. अग्नीवीर भरती मार्गदर्शनही या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले. प्रदर्शनाच्या उदघाटनाला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण राज्यमंत्री अजय भट, सेनाप्रमुख मनोज पांडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच युनायटेड वि स्टँड ग्रुपचे अध्यक्ष सागर मटाले आदींसह खेळाडू उपस्थित राहणार आहे.

- Advertisement -
आर्मी सिम्फनी बॅण्डचे खास आकर्षण

याचबरोबर या प्रदर्शनात आर्मी सिम्फनी बॅण्डचे खास आकर्षण असणार आहे. प्रदर्शनात आर्मी सिम्पनी बँड सादरीकरण करण्यात येणार आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिककर यांनी यावे असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य या शस्त्रास्त्र प्रदर्शनातून दिसून येत आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी मिलिटरी बँण्डचे वादन करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -