Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रNew Government : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? यावेळी ठिकाण बदलण्याची शक्यता

New Government : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? यावेळी ठिकाण बदलण्याची शक्यता

Subscribe

विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरचा मुहूर्त भाजपाने काढला आहे. त्यामुळे शपथविधीपूर्वी महायुतीला खातेवाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरचा मुहूर्त भाजपाने काढला आहे. त्यामुळे शपथविधीपूर्वी महायुतीला खातेवाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे. (The swearing-in ceremony of the new Chief Minister of Maharashtra is likely to take place at Azad Maidan on December 5)

नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवाजी पार्क किंवा वानखेडे स्टेडीयमवर करण्याची महायुतीची सुरुवातीला योजना होती. त्यासाठी 2 डिसेंबर ही तारीख ठरली होती. पण भाजपाच्या नेत्यांनी ही तारीख नको असा निरोप दिला. आता दोन दिवसात मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. या महिन्यातील हा पहिलाच गुरुवार असल्याने भाजपाच्या दृष्टीने तो शुभ दिवस आहे. त्यामुळे शपथविधीसाठी 5 डिसेंबरची तारीख आता पुढे आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politic : मुख्यमंत्री ठरण्याआधीच घडामोडींना वेग? जितेंद्र आव्हाडांनी घेतली शिंदेंची भेट

शपथविधी सोहळ्यासाठी सर्वप्रथम शिवाजी पार्क मैदानाचा पर्याय पुढे आला होता. परंतु,  मुंबई महापालिकेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर तयारी सुरू आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, सध्या वानखेडे स्टेडीयमवर  क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. ब्रेबोन स्टेडीयम सरकारी कार्यक्रमासाठी दिला जात नाही. महालक्ष्मी रेसकोर्सवर 3 डिसेंबरपर्यंत कार्यक्रम आहेत. त्यामुळे रेसकोर्स 4 डिसेंबरला ताब्यात येऊ शकतो. परंतु तेथे तयारीला फार वेळ मिळणार नाही. वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीएचे मैदान तुलनेत लांब आहे. अशातच शपथविधी सोहळ्यासाठी हे मैदान लहान पडेल, असे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर आझाद मैदानाचा पर्याय निवडण्यात आल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

सध्या आझाद मैदानात पुढील तीन दिवस एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. या मेळाव्याला लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे या मेळाव्यानंतर साफसफाईचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र, अन्य मैदान उपलब्ध होत नसल्यामुळे अखेर भाजपाने नव्या सरकारच्या शपथविधीसाठी आझाद मैदानची निवड केल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – New Government : सत्तास्थापनेस का होतोय उशीर? जाणून घ्या कारणं…


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -