घरमहाराष्ट्रनागपूरसमाजा-समाजात भांडणे लावून राज्याला वेठीस धरण्याचे काम; Wadettiwar यांचा सरकारवर आरोप

समाजा-समाजात भांडणे लावून राज्याला वेठीस धरण्याचे काम; Wadettiwar यांचा सरकारवर आरोप

Subscribe

धर्म द्वेषातून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार तयार नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केली आहे.

नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्ला केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने दोन समाजात भांडण लावून राज्याला वेठीस धरण्याचे काम केले आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

आरक्षणासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. यातील दोन विषय महत्वाचे आहेत. यात आरक्षणाचा खेळखंडोबा सरकारने त्यांच्या राजकारणासाठी केला आहे. दोन समाजात भांडणे लावून दोन बाजूला पक्ष उभे राहून. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. खरे तर पक्ष फोड्यापासून स्वत:ची बतनामी झाकण्यासाठी आणि गेलेली पत सुधारण्यासाठी सरकारने मराठा विरूद्ध ओबीसी आणि धनगर विरूद्ध आदिवासी अशा समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : उपराजधानीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बट्टाबोळ…; अधिवेशनापूर्वी वडेट्टीवार कडाडले

इम्परिकल डेटा गोळा करण्याची आठवण

विजय वडेट्टीवार म्हणाले, “या सरकारकडे आमची मागणी होती. राज्य सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा. पण या सरकारला दीड वर्ष होऊन ही कोणतीही भूमिका या सरकारने अद्यापही स्वीकारलेली नाही. मग मराठा आरक्षण किंवा ओबीसीच्या आरक्षणासाठी. सरकारला इम्परिकल डेटा गोळा करण्याची आठवण या सरकारला करून दिली होती. पण या सरकारने त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय सरकारने दीड वर्षात घेतला नाही. आता बिहारच्या धर्तीवर जनगणना आणि आरक्षण देण्याचा विचार सरकार करत आहे. पण हे केवळ अधिवेशनाच्या तोंडावर दिलेले आश्वासन आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार; शंभरहून अधिक मोर्चे विधिमंडळावर धडकणार

मुस्लिमांना धर्मद्वेष म्हणून आरक्षण देत नाही

मुस्लिम आरक्षणासंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, “धनगर समाज एसटीचे आरक्षण मागत आहे. या टीचा अहवाल जो मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर धुळखात पडला आहे. त्यावरची धुळू झडकण्याचे सुद्धा कष्ट शिंदे-फडणवीस सरकारने घेतले नाही. मुस्लिम आरक्षणाला न्यायालयाचा कोणतीही अडथळा नाही. पण धर्म द्वेषातून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार तयार नाही. लिंगायत असेल किंवा इतर समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष देण्याला या सरकारला वेळ नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -