घरमहाराष्ट्रठाकरे परिवाराने २५ वर्षे मुंबई महापालिकेत लूटमार केली; प्रवीण दरेकरांचा घणाघात

ठाकरे परिवाराने २५ वर्षे मुंबई महापालिकेत लूटमार केली; प्रवीण दरेकरांचा घणाघात

Subscribe

मुंबईची भोळी भाबडी जनता, 25 वर्ष या ठिकाणी शिवसेनेच्या हातात सत्ता होती आणि आजही आम्ही मुंबईचे तेच प्रश्न घेऊन मुंबईचा जागर करण्यासाठी आपल्यासमोर आलो आहोत, असेही दरेकर म्हणाले.

मुंबई – घाटकोपर येथे काल भाजपाची मुंबईचा जागर सभा पार पडली. या सभेत बोलताना विधान परिषदेचे गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेत ठाकरे परिवाराने मराठी माणसाच्या नावे सत्ता उपभोगत गेली 25 वर्ष लूटमार केली. त्यांचा हा धंदा बंद करायचा असल्याचे आवाहन उपस्थितांना केले.

हेही वाचा – दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश पुन्हा लांबला; भाजपाचा प्रखर विरोध

- Advertisement -

यावेळी बोलताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, या सभेची आज गरज का लागली. मुंबई करांना आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जागे करायला आलोत. कारण 25 वर्ष या महापालिकेवर आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका त्यांच्या ताब्यामध्ये दिली आणि अक्षरशः या महापालिकेला लुटण्याचे काम भ्रष्टाचारच्या माध्यमातून या ठिकाणी ठाकरे परिवाराने केले हे मुंबईकरांनी पाहिलेले आहे. राम कदम आपण सांगितले की पद हे सेवेसाठी आहे, घर चालवण्यासाठी नाही. पण 25 वर्ष या महापालिकेच्या माध्यमातून सत्ता ही ठाकरे यांचे घर चालवण्यासाठी राबवली गेली. हा माझा जाहीर आरोप आजच्या सभेतून आहे. मुंबईची भोळी भाबडी जनता, 25 वर्ष या ठिकाणी शिवसेनेच्या हातात सत्ता होती आणि आजही आम्ही मुंबईचे तेच प्रश्न घेऊन मुंबईचा जागर करण्यासाठी आपल्यासमोर आलो आहोत, असेही दरेकर म्हणाले.

हेही वाचा – भाजपची नवी खेळी, सुषमा अंधारेचे पती शिंदे गटात जाणार

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, एका बाजूला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वचा मूळ विचार दिला. त्या विचाराशी प्रतारणा केली. भाजपच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी सत्ता आणली. हिंदुत्वाच्या नावावर त्या ठिकाणी मते मागितली. आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो लावून त्या ठिकाणी मते मागितली व निवडून आले. त्यानंतर सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर लाचारी करण्याचे काम या उद्धव ठाकरे यांनी केले. केवळ सत्तेसाठो लाचारी, हिंदुत्वाला तिलांजली समजू शकतो परंतु किती लांगुलचालन करावे. आपण बघाल त्या ठिकाणी नवाब मलिक जेलमध्ये गेल्यावरही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचे धाडस उद्धव ठाकरे यांनी दाखवले नाही. केवळ त्या ठिकाणी सत्तेसाठी लांगुलचालन करण्याचे काम उद्धव ठाकरे आपण त्या ठिकाणी केलात. याकूब मेमनलात्या ठिकाणी फाशी दिल्यानंतर त्याच याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करण्याचे पापही उद्धव ठाकरे आपल्या सरकारच्या माध्यमातून झाले. तुम्ही दाऊदला पाठीशी घालणार, तुम्ही याकूबच्या कबरीचे उदात्तीकरण करणार आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी गुमराह करण्याचे काम करणार आहात त्याविरोधात भाजप जागर मुंबईचा करत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांची पालिकेची सत्ता उखाडून टाकण्याचे काम करायचे आहे.

राज्यात सत्ताबदल झाला आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे याकूबच्या कबरीचे उदात्तीकरण करतात आणि दुसऱ्या बाजूला या राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अफझल खानाच्या कबरी जवळील अनधिकृत बांधकाम एका दिवसात जमीनदोस्त करण्याचे काम करतात. हा फरक सरकारमधला आहे. हा फरक सांगण्याचे काम जागरच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात लांगुलचालन चालले. कबरीचे उदात्तीकरण चालले आणि आमच्या काळात हिंदू देवदेवतांचा अपमान होणार असेल, कबरीवर अतिक्रमण करणार असाल तर ती जमीनदोस्त करणार हे सांगणारा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

मुंबई महापालिका ही जगातील मोठी महापालिका आहे. त्या ठिकाणी जवळपास 30-35 हजार कोटी बजेट आहे. 25 वर्ष या पालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे, कारभार चालू आहे. मातोश्री एक होती आणि दुसरी सूरु झाली. माझा या जागरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना सवाल आहे, मातोश्री एक ची दोन कशी झाली. मुंबई महापालिकेच्या शाळा एकच्या दोन का झाल्या नाहीत. आगामी पालिका निवडणुकीत याचा जब मुंबईकर जनता तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. ज्या मराठी माणसाच्या जीवावर मुंबईत राज्य केलात, 25 वर्ष सत्ता उपभोगलात तो मराठी माणूस विरारला घर घ्यायला का गेला? उद्धवजी तुमची मातोश्री एक झाली मातोश्री दोन झाली. मात्र मराठी माणूस कुणी घर देता का घर यासाठी वणवण फिरतोय. तो हिशोब चुकता करण्यासाठी हा जागर आहे. मुंबईची आज अवस्था काय आहे. 25 वर्षानंतर आजही मुंबईतील रस्त्यांवर खड्डे आहेत. रस्त्यावर लाखो कोटींचा बजेट होतो तो पैसा कुठे जातो. आजही नाळेसफाई नावाखाली करोडोचा खर्च दाखवला जातो. मात्र नालेसफाई होऊ शकत नाही. तो पैसा कुठे जातो. हा सवाल विचारण्यासाठी आपल्याला जागरच्या माध्यमातून लोकांना जागे करण्याची भूमिका घ्यायची असल्याचे आवाहनही यावेळी दरेकर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -