घरमहाराष्ट्रकडक्याची थंडी अजूनही लांबच

कडक्याची थंडी अजूनही लांबच

Subscribe

अरबी समुद्रात नुकताच निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे अजूनही तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात असेच चढ-उतार होण्याची शक्यता असून कडाक्याच्या थंडीसाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे़. राज्यात अनेक ठिकाणी सध्या सरासरीच्या जवळपास किमान तापमान आहे़. राज्यात शनिवारी सर्वांत कमी तापमान अहमदनगर येथे १२.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़.

रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ तर कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. दक्षिणेत अद्याप तमिळनाडू, केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असून त्याचा परिणाम आपल्याकडे झाला आहे. पुढील दोन आठवड्यात मध्य भारत, पश्चिम भारतातील अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पुण्यात दोन आठवड्यांपूर्वी राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. पुण्यात शनिवारी १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यापुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात वाढ होऊन ते १३ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.़

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -