घरताज्या घडामोडीआषाढी वारी पालखी सोहळा निघणारच; प्रथा,परंपरा खंडीत होणार नाही

आषाढी वारी पालखी सोहळा निघणारच; प्रथा,परंपरा खंडीत होणार नाही

Subscribe

प्रथा,परंपरा खंडीत होणार नाही. त्यामुळे आषाढी वारी पालखी सोहळा निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन नये, याकरता लॉकडाऊन वाढवण्याच निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच राज्यातील अनेक महत्त्वाची मंदिर देखील काही दिवसांसाठी बंद करण्यात आली असून यामध्ये पंढरपुरातील विठुरायाच्या मंदिराचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे यंदा ज्ञानेश्वर माऊलींची आषाढीची वारी यंदा निघणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र, परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे माऊलींचा पालखी सोहळा निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रथा, परंपरा खंडीत होणार नाही

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारी पालखी सोहळा निघणार आहे. प्रथा, परंपरा खंडीत होणार नाही. तसेच कोणताही प्रादुर्भाव होणार नाही याची देखील दक्षता घेतली जाईल. त्याचप्रमाणे याबाबत सरकारशी चर्चा करणार असल्याचे माऊली पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. देवव्रत वासकर महाराज यांनी जाहिर केले आहे.

- Advertisement -

आषाढी यात्रेबाबत आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या प्रमुखांची व्हिडिओ काँन्फरसिंगद्वारे चर्चा झाली. या चर्चेचा विषय होता की आषाढी पालखी सोहळला निघणार का? या चर्चेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, आरफळकर मालक, शितोळे सरदार, देवव्रत वासकर महाराज, राजाभाऊ चोपदार, अभय टिळक, कुलकर्णी, जळगावकर महाराज आदी चर्चेत सहभागी झाले होते. या चर्चेमध्ये पालखी सोहळा निघणार असल्याचे सांगण्यात आले.

मार्ग बदलून पालखी जाणार

असं पाहिल गेल तर सर्व पालख्यांचे मार्ग हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे यंदा पालखीचे मार्ग बदलले जाणार आहेत. यामध्ये माऊलीचा पालखी सोहळा थेट पुणे येथून न जाता. सासवड येथून पंढरपूरकडे रवाना होईल. तसेच एखाद्या पालखी सोहळ्याला जर ठराविक व्यक्तींची परवानगी मिळाली तर. तर संबंधित परवानगी ही सर्वच पालखी सोहळ्याला लागू असणार आहे. यामध्ये संपूर्ण पायी पालखी सोहळा हा सोशल डिस्टन्सचे पालन करेल. त्याचप्रमाणे याबाबत सरकारशी चर्चा करुनच पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दारूसाठी रांगेत उभे राहिलेल्यांचे रेशन कार्ड रद्द करा; इम्तियाज जलील यांची मागणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -