घरताज्या घडामोडीनदीत आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही आणि मृत्यू ओढावला

नदीत आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही आणि मृत्यू ओढावला

Subscribe

नदीत पाहताच आंघोळ करण्याचा मोह झाला आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

गडचिरोली-चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या पत्रात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये निलज येथील ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयातील एका प्राध्यपकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नदीत पाहताच आंघोळ करण्याचा मोह झाला आणि त्यातच या दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; कोरेगाव चोप येथे राहणारे प्रा. पद्माकर तानबाजी मडावी (४२) आणि कुरुड येथे राहणारे संजय मारोती उके (४०) हे दोघेही निलज तालुका ब्रम्हापुरी येथे ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते. दरम्यान, सध्या संचारबंदी असल्यामुळे हे दोन मित्र मंगळवारी सायंकाळी डोंग्याने वैनगंगा नदी पार करुन चंद्रपुर जिल्ह्यातील खरकाडा घाटावर पोहोचले. त्यानंतर त्यांना नदीला पाहून आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्यांनी नदीपात्रात आंघोळ करण्याचा विचार केला आणि नदीत उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. त्यानंतर त्यांचे सकाळी मृतदेह दिसून आले. तर त्यांची दुचाकी नदीच्या गडचिरोली जिल्ह्यातील तीरावर आढळून आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे सर्व मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडा पहारा आहे. त्याचप्रमाणे ई-पास असल्याशिवाय जिल्ह्याच्या सीमा ओलांडता येत नाहीत. त्यामुळे अनेकजण पोलिसांच्या भीती पोटी चोरवाटा शोधून आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.


हेही वाचा – मरिन ड्राईव्ह येथे कारचा अपघात; एकाचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -