घरक्राइमदुचाकीचालकास महिला पोलिसाशी वाद घालणे पडले महागात

दुचाकीचालकास महिला पोलिसाशी वाद घालणे पडले महागात

Subscribe

न्यायालय उठेपर्यंत शिक्षेसह तीन हजारांचा दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन महिला पोलिसाशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणणार्‍या दुचाकीचालकास जिल्हा न्यायालयाने पुरावे व साक्षीदारांच्या आधारे दोषी ठरवले. न्ययालयाने सोमवारी (दि.१५) आरोपीस कोर्ट उठेपर्यंत थांबून राहण्याची आणि तीन हजार रुपयांची शिक्षा सुनावली. ही घटना सोबीएस चौकात ३ सप्टेंबर २०१२ मध्ये घडली होती. गुलाम रसूल मुसा शेख (वय २२, रा. शिवनेरी नगर, टाकळी रोड, व्दारका) असे शिक्षा झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.

वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी वैशाली वानखेडे सीबीएस चौकात वाहतूक नियंत्रित करीत होत्या. दुचाकीचालक प्रिया हॉटेलकडून शालिमारच्या दिशेने भरधाव वेगाने दुचाकी (एमएच १५-बीएच २८१५)ने जात होता. वानखेडे यांनी त्यास थांबण्यास सांगितले. मात्र, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. वानखेडे यांनी त्यास सपट दुकानाजवळ अडवून दुचाकीची चावी काढून घेतली. त्याने आरडाओरड करत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार देण्याची धमकी देत गर्दी जमविली. याप्रकरणी वैशाली वानखेडे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस हवालदार एस. एम. सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीविरुद्ध पुरावे व दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. आर. वाय. सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, पंच, साक्षीदार, पुराव्यास अनुसरुन आरोपीस न्यायालय उठेपर्यंत थांबून राहण्याची आणि तीन हजार रुपयांची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून व्ही. एस. सोनवणे व आर. आर. जाधव यांनी पाठपुरावा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -