घर महाराष्ट्र टाळ्यांचा न येणारा आवाज खूप बोलका, अजित पवारांच्या बारामतीतील सभेवरून रोहित पवारांचा...

टाळ्यांचा न येणारा आवाज खूप बोलका, अजित पवारांच्या बारामतीतील सभेवरून रोहित पवारांचा इशारा

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल, शनिवारी आपल्या बारामती मतदारसंघाचा दौरा केला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर हा पहिलाच बारामती दौरा होता. तिथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. या स्वागताने ते भारावून गेले होते. तिथे त्यांचे भाषणही झाले. याच भाषणाबद्दल ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोपरखळी लगावली आहे.

- Advertisement -

बारामतीत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांच्यावर जेसीबीमधून फुले उधळण्यात आली. तब्बल 65 दिवसांनंतर अजित पवार मतदारसंघात आले होते. या स्वागताने ते भारावून गेले. आज मी जो काही आहे तो बारामतीकरांमुळे आहे. बारामतीकरांनी माझ्यावर अफाट प्रेम केले. माझ्या स्वागताला एवढी गर्दी, एवढी रेटारेटी आयुष्यात या आधी कधी पाहिली नाही. ढकला ढकली होत होती, मात्र काही हातात हात घेणे सोडत नव्हते. काहींनी तर हातावर किसच घेतले. माझ्या बायकोने देखील जेवढे घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले, असे वक्तव्य करत अजित पवार यांनी या स्वागताला दिलखुलास दाद दिली.

हेही वाचा – ‘आज देश चंद्रावर चाललाय पण काही लोक घरात बसूनच’, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

- Advertisement -

राज्यात कुठल्याही घटकाला असुरक्षित वाटणार नाही, असे आश्वासन देतानाच, मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही. सत्ता येत असते, जात असते, असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुणे – नगर – नाशिक रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देतानाच, आपण फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – शासन आपल्या दारी अन् थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

या दौऱ्यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत अजित पवार यांच्यावर टीका केली. बारामतीत झालेली विकासकामे बघता अजितदादा कामाला खरंच ‘दादा’ आहेत आणि बारामतीची जनता कामाला पाठिंबा देणारी असल्याने आजवर झालेली कामे बघता त्यांनी अजितदादांना नेहमीच डोक्यावर घेतले. पण हे बारामतीकर खूप हुशार आहेत, काल (शनिवारी) अजितदादांच्या भाषणात टाळ्या वाजवायचे आणि भाजपा व त्यांच्या नेत्यांचा उल्लेख झाल्यावर मात्र गप्प बसायचे. हा टाळ्यांचा न येणारा आवाज खूप बोलका आहे आणि तो संपूर्ण राज्यातच ऐकायला मिळणार आहे, अशी कोपरखळी त्यांनी लगावली आहे.

- Advertisment -