Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक : घरात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान प्राणघातक हल्ला

धक्कादायक : घरात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान प्राणघातक हल्ला

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

Related Story

- Advertisement -

कल्याणच्या सापर्डे गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. काळजाचा थरकाप उडवणारी अशी ही घटना आहे. कल्याणच्या सापर्डे गावात एका घरात हळदीचा कार्यक्रम सुरु होता. संध्याकाळच्या वेळी हळदीचा कार्यक्रम सुरु असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी घरातील ३ जणांवर प्राणघातक हल्ला केला आहे. या प्राणघातक हल्ल्यात २ जण जखमी आणि १ महिलेचा मृत्यू झाला आहे. परंतु हा हल्ला का करण्यात आला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या कुटूंबावर झालेला हल्ला चोरीच्या उद्देशाने करण्यात आला की पूर्ववैमनस्यातून करण्यात आला याचा तपास पोलिस करत आहेत. कुटूंबावर प्राणघातक हल्ला करुन हल्लेखोरांनी पळ काढला आहे. कल्याण खडकपाडा पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदन करण्यास पाठवला आहे तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या हल्ल्यातील मृत महिलेचे नाव सुवर्णा घोडे आहे तर, जगदीश म्हात्रे आणि भारती म्हात्रे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेची अधिक चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हळदीच्या कार्यक्रमात अज्ञात हल्लेखोरांनी तीघांवर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे सापर्डे गावात एकच खळबळ माजली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील सापर्डे गावात काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी कुटूंबावर हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनास पाठवला आहे. खडकपाडा पोलिस घटनेचा तपास करत आहेत. हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आला आहे की, चोरीच्या हेतूने यावर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -