घरमहाराष्ट्रसाहित्य संमेलनात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीतून उलगडले भटक्या विमुक्त समाजाचे दर्शन

साहित्य संमेलनात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीतून उलगडले भटक्या विमुक्त समाजाचे दर्शन

Subscribe

जळगाव (अमळनेर)-
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारपासून जळगाव अमळनेर येथे सुरु झालं आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी व्यासपीठाच्या पहिल्या सत्रात रवींद्र गोळे , सारंग दर्शने यांनी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी मुलाखतीतून भटक्या विमुक्त समाजाबद्दलचे मत व्यक्त केले.

“मरीआई, नंदी बैल आणि पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना समाजानेही साथ देणे गरजचे आहे. आधुनिकतेची कास धरत चंद्रावर जात असताना भटक्या विमुक्त समाजालाही समजून घेत त्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे साहित्य आणि युवक तयार झाले पाहिजेत. ही काळाची गरज आहे” असं मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केलं.

- Advertisement -

“निमगाव म्हाळगी येथे राहत असताना गावात नंदी बैलवाला, मरीआई वाले, पारधी भिक्षा मागायला येतात. शिक्षण, संस्कार या सारख्या विविध बाबींचा गंधही नसलेल्या या समाजाबद्दल जवळून माहिती घेतली आणि ठरवले की या समाजाच्या प्रगतीसाठी आपण काम करायला हवे.”

“ही स्थिती तेव्हाची असली तरी आजही ग्रामीण भागातील स्थिती फारशी वेगळी नाही. ग्रामीण भागात आजही पाण्याची स्थिती गंभीर आहे. तेव्हा हा समाज गावाच्या प्रमुखाची कामे विनामोबदला करतो. त्या बदल्यात प्रमुख त्यांना धान्य देतात. पुढे काळ बदलला प्रमुखांकडून मोफत धान्य देणे बंद झाले आणि बारा बलुतेदार त्यांच्या कामासाठी आणि मोबदल्यासाठी वणवण फिरू लागले. कामधंदा नसल्याने चोऱ्या करू लागले. त्यामुळे कुठेही काही झाले की पहिला संशय यांच्यावरच यायचा. त्यावेळी पोलीस येऊन पुरूषांना पकडून घेवून जायचे. त्यानंतर त्यांच्या महिला मग कोर्टकचेऱ्यातच आयुष्य घालवत. अशा रितीने या समाजाचे जीवन हालाखीचे झाले आहे”. ही सामाजिक असंतोषाची नांदी असल्याचे गिरीश प्रभुणे यांनी सांगितलं.

- Advertisement -

“सी.एम. केतकर, माजगावकर, शरद कुलकर्णी अशा आमच्यात साहित्य परिषदेत मार्क्सवादावर खडाजंगी चर्चा होते. माणूस या साप्ताहिकात लेखन करत असतो. माजगावकरांनी नुसते असे लेखन करण्यापेक्षा कृती करून लेखन करण्याचा सल्ला दिला आणि तो तंतोतंत अंमलात आणला. त्यासाठी मी काही दिवस खेडेगावात राहायला गेलो. ३० ते ४० जण परिवारासह तिथे आले होते. त्यावेळी कोणताही कार्यक्रम, राजकीय सभा नसताना एवढी गर्दी पाहून उत्सुकता वाढली. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे केलं. त्यानुसार त्यांच्या गावात पाण्याची टंचाई असल्याने शेती पिकली नाही. . प्यायला पाणी नाही म्हणून गाव सोडून जात असल्याचे त्यांनी सांगितले.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -