घरताज्या घडामोडीबुधवारपासून राज्यात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

बुधवारपासून राज्यात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बुधवार १४ एप्रिल रात्री ८ पासून पुढील १५ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.  ‘१४४ कायदा लागू करत राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली असून अत्यावश्यक कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु बेडची कमतरता निर्माण झाली असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. फेसबूकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्र्यानी लोकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले.

कोरोनाची साखळी जर तुटली नाही तर ही साखळी आपल्याला गुरफटुन घेल त्यासाठी राज्यात काही कडक निर्बंध लागू केले पाहिजेत. निर्बंध घालतो परंतु पर्याय नाही, पण काही निर्बंध तसेच आहेत साखळी तुटायला हवी, रोजीरोटी महत्त्वाची आहेच त्यासोबत जीवही वाचवायला हवेत. आजपर्यंत जे निर्बंध टाकले ते वाढवण्यात येत आहे. उद्या १४ एप्रिलपासून रात्री ८ पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल मतदान झाल्यानंतर तिथेही कडक निर्बंध लागू करण्यात येतील. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करत नाही आहोत परंतु अत्यावश्यक सेवांसाठी या वाहतूक सेवा सुरु राहणार आहेत.

- Advertisement -

कोरोनाविरोधातल्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज राज्यात ६० हजरा २१२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी रोज सव्वा २ लाख कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन तयार करण्यास खूप दिवस लागत आहेत. राज्यात होणाऱ्या तुटवड्यावर लवकरच मात करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. परंतु कडक लॉकडाऊन करण्यावर भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. यानंतर टास्क फोर्ससोबतही व्हिसीद्वारे बैठक घेतली होती. टास्क फोर्ससोबत घेतलेल्या बैठकीत डॉ.तात्याराव लहानेही उपस्थित होते. राज्यात लॉकडाऊन करण्यावाचून पर्याय नसल्याचे मतही टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री राजेश टोपे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. इतरही नेते या बैठकीत होते परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे वैद्यकीय कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांकडून लॉकडाऊन बाबत तसेच राज्यातील जनतेची गैरसोय होणार नाही यावर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -