घर महाराष्ट्र बायकोने जेवढे किस घेतले नाही, तेवढे...; अजित पवारांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताला दिली...

बायकोने जेवढे किस घेतले नाही, तेवढे…; अजित पवारांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताला दिली दाद

Subscribe

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आज बारामती दौऱ्यावर (Baramati tour) आहेत. या दौऱ्यादरम्यान बारामतीत दाखल होताच त्यांचं जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच बारामती दौरा आहे. त्यामुळे संपूर्ण बारामतीकर अजित पवारांच्या स्वागताला आल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून जोरदार पुष्पवृष्टी करण्यात अजित पवारांचे स्वागत केले, तर एका कार्यकर्त्यांने स्वत:ला क्रेनला बांधून अजित पवारांना हार घातला. बारामतीकरांना करण्यात आलेल्या जोरदार स्वागताला अजित पवारांनी सभेतील भाषणातून दाद दिली. (The wife didnt kiss as much as Ajit Pawar appreciated the welcome given by the baramatikar)

हेही वाचा – बंडखोरीआधी पंतप्रधानांविरोधात सभा का घेतल्या? अजित पवारांनी बारामतीकरांना सांगितलं कारण…

- Advertisement -

अजित पवार बारामतीत पोहचताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर शिवाजी पार्क येथून खुल्या जीपमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांची बारामतीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. चारही बाजूंनी जीपवर फुलांचा वर्षाव होत होता. नागरिक, व्यापारी संस्था, कार्यकर्ते, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांचे पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले. अनेक ठिकाणी जेसीबी मशिनच्या सहाय्याने त्यांच्यावर फुले उधळण्यात आली. अजित पवार यांच्यावर अंदाजे दोन टनांहून अधिक फुलांचा वर्षाव करण्यात आला. याच स्वागताला अजित पवार यांनी दाद दिली आहे.

बारामतीत झालेल्या स्वागताबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, माझ्या स्वागताला एवढी गर्दी, एवढी रेटारेटी आयुष्यात या आधी कधी पाहिली नाही. अनेकांनी माझा हात हातात घेतला. ढकला ढकली होत होती, मात्र काही हातात हात घेणं सोडत नव्हते. काहींनी तर हातावर किसच घेतले. माझ्या बायकोने घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले, असे वक्तव्य करत अजित पवार यांनी बारामतीकरांनी केलेल्या स्वागताला दिलखुलास अंदाजात दाद दिली.

- Advertisement -

हेही वाचा – फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने आम्ही काम करत आहोत – अजित पवार

‘मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही

महाराष्ट्रातील एकाही घटकाला असुरक्षित वाटू नये, राज्यात कुठल्याही घटकाला असुरक्षित वाटणार नाही, बारामतीत येताना पिकं सुकलेली दिसली, त्यासाठी राज्य सरकार योग्य निर्णय घेणार, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही,सत्ता येत असते, जात असते, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संकटात लोकांना आधार द्यावा लागतो, पुरंदर उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मांडणार,राज्यात पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक, चांगल्या पावसासाठी मयूरेश्वराला साकडं घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

- Advertisment -