घरमहाराष्ट्रधक्कादायक! महिलेने स्वत:च्या हाताने केली प्रसूती

धक्कादायक! महिलेने स्वत:च्या हाताने केली प्रसूती

Subscribe

महिलेने स्वत:च्या हाताने प्रसूती केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

महिलेने स्वत:च्या हाताने प्रसूती केल्याची धक्कादायक घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात घडल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रविवारी ही घटना घडली असून सुदैवाने बाळ आणि बाळंतीन सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे डॉक्टर आणि परिचारिकांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रसूती आधी आणि नंतर या महिलेला फरशीवर झोपवण्यात आले होते. परंतु या घटनेने मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शहरातील आरोग्य सेवेचा ढिसाळ कारभार जगासमोर आला आहे.

असा घडला हा धक्कादायक प्रकार

नागपूररच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाता हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी पहाटेच्या दरम्यान घडला आहे. सुकेशनी चतारे असे पीडित महिलेचे नाव आहे. सुकेशनीला रविवारी पहाटे प्रसूती वेदना असह्य झाले. मात्र त्यावेळी डॉक्टर किंवा परिचारीका उपस्थित नसल्याने त्या महिलेला स्वत:ला आपली प्रसूती करवी लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतरही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचा निष्काळजीपणा थांबला नाही. बाळ आणि बाळंतीनला अक्षरश: फरशीवर झोपवण्यात आले. नागपुरातील या धक्कादायक घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व प्रकाराची चौकशीचे आदेश देखील दिले आहेत.

- Advertisement -

 

दोषी डॉक्टर आणि परिचरिकांवर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार आहे.  चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री

या घटनेची चौकशी करण्यासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाने समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्या दुपारपर्यंत समिती आपला अहवाल सादर करणार आहे. पेशंटची संख्या जास्त आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीतनरेंद्र तिरपुडे, प्रभारी अधिष्ठाता


वाचा – प्रसूती दरम्यान अतिरक्तस्रावामुळे १९३ महिलांचा मृत्यू

- Advertisement -

वाचा – सिझेरियन प्रसूती – समज, गैरसमज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -