मुंबई : “अभिनेत्री ऐश्वर्या राय दररोज मासे खायची, त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर झाले आहे”, असे वादग्रस्त विधान भाजपचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी धुल्यातील सभेत केले. विजयकुमार गावित यांनी केलेल्या विधानावर राज्याच्या महिला आयोगाकडून त्यांना नोटीस पाठविली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विजयकुमार गावित यांना नोटीस पाठवून तीन दिवसांत उत्तर देण्याचे सांगितले आहे. यासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत नोटीस पाठविल्याची माहिती दिली आहे.
महिला आयोगाने पाविलेल्या नोटिशीनुसार, कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा आलेख त्या राज्यातील स्त्रियांची स्थिती आणि सुरक्षितता यावरुन ठरविला जातो. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा व वर्तनाचा दिर्घ परिणाम समाजमनावर होतो आणि त्यातूनच सुदृढ वैचारिक समाजाची निर्मिती होत असते. सकल समाज घडवण्याची प्राथमिक जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळेच लोकप्रतिनीधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. तरी आपण केलेल्या वक्तव्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार आयोगास तीन दिवसात प्राप्त होईल, अशारितीने खुलासा सादर करावा.”
धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना मंत्री विजय कुमार गावित यांनी महिलांचा अवमान होईल असे वक्तव्य केले. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा, वर्तनाचा दीर्घ परिणाम समाजमनावर होतो असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे.1/2 pic.twitter.com/4sjDbTmR5u
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 21, 2023
नोटीस नेमके काय म्हणाले
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना भारतीय संविधानाचे अनुच्छेद १४,१५ व १६ अन्वये स्त्रियांच्या संबंधात हमी देण्यात आलेले मुलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्याच्या उद्देशाने आणि स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरीता संविधानाच्या अनुच्छेद ३८. ३९. ३९ अ व ४२ मध्ये अंतर्भूत केलेली राज्याच्या धोरणाची निदेशक तत्वे अंमलात आणण्यासाठी, तसेच स्त्रियांवर परिणाम करणा- या कायद्यांचे परिणामकारकरित्या संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे व उंचावणे या गोष्टींशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर शासनाला सल्ला देण्यासाठीच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे
धुळे जिल्हयातील अंतुर्ली येथील समेत उपस्थितांना संबोधित करताना आपण महिलांचा अवमान होईल, असे वक्तव्य केले असल्याबाबतचे व्हिडिओ माध्यमांवरुन प्रसारित झाले आहेत. आपण केलेल्या वक्तव्यांमुळे समाजातील सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा आलेख त्या राज्यातील स्त्रियांची स्थिती आणि सुरक्षितता यावरुन ठरविला जातो. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा व वर्तनाचा दिर्घ परिणाम समाजमनावर होतो आणि त्यातूनच सुदृढ वैचारिक समाजाची निर्मिती होत असते. सकल समाज घडवण्याची प्राथमिक जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळेच लोकप्रतिनीधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे.
तरी आपण केलेल्या वक्तव्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार आयोगास तीन दिवसात प्राप्त होईल, अशारितीने खुलासा सादर करावा.
हेही वाचा – ऐश्वर्या रायसारखे मासे खा, कोणालाही पटवाल; गावित यांच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटणार तोंड?
विजयकुमार गावित नेमके काय म्हणाले
विजयकुमार गावित म्हणाले की, मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर माणूस म्हणजे बाईमाणूस चिकणे दिसायला लागतात आणि डोळे तरतरीत दिसतात. कुणीही बघितली तरी पटवूनच घेणार. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना, ती बेंगळुरला समुद्रकिनारी राहायची. त्यामुळे ती दररोज मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत. माशांमध्ये तेल असते. माशांच्या तेलामुळे डोळ्यांना आणि त्वचेला चांगला फायदा होतो. गावित यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ते कुजबूज सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी उभे राहून गावित यांचे विधान फारसे पटले नसल्याचे दर्शवले.