घरताज्या घडामोडीधक्कादायक! आईला कोरोना झाल्याने तरूणाने केली आत्महत्या

धक्कादायक! आईला कोरोना झाल्याने तरूणाने केली आत्महत्या

Subscribe

आईला कोरोना झाल्याचे समजताच २३ वर्षीय तरूणाने ताणतणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक महानगरात उघडकीस आली. आकाश मच्छिंद्र जाधव (रा. रोकडोबावाडी, नाशिक) असे मृताचे नाव आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस बाधित रूग्णांसह मृतांचा आकडा वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ८ हजारपार कोरोनाबाधित रूग्ण असून ३71 बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, एकट्या नाशिक महानगरात १९३ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंता व भितीचे वातावरण आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश जाधवच्या आईला कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्यांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ही बाब आकाशला समजताच तो बुधवारी (दि.१५) आईला भेटण्यासाठी रूग्णालयात गेला. तेथून घरी परतल्यावर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. तो बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या बहिणीने शेवटी खोलीचा दरवाजा तोडला. आत त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. बहिणीने स्थानिकांच्या मदतीने त्याला तत्काळ उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासत त्याला मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक काकड करत आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या भितीने तिघांच्या आत्महत्या
नाशिक महानरात कोरोनाच्या भितीने अद्यापपावेतो तीनजणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ११ एप्रिल रोजी करोना झाल्याच्या भितीने चेहडी (नाशिकरोड) येथील प्रतिक कुमावत (३१) आत्महत्या केली. विशेष म्हणजे याच दिवशी मालेगाव शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले उपनिरीक्षक अझरुद्दीन हुसेनुद्दीन शेख (३५) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने जेवण सोय नसल्याने व जळगावला जात येत नसल्याने नाशिकमध्ये शिक्षणासाठी आलेल्या युवकाने आत्महत्या केली. तर १५ जुलै रोजी आकाश जाधव याने आईला कोरोना झाल्याने आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -