घरमहाराष्ट्रनाना पटोलेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक

नाना पटोलेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक

Subscribe

विधानसभा अधिवेशनातही नाना पटोले यांनी आक्रमक होत विरोधकांवर घणाघात केला होता.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात एका तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. या तरुणाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आकाश पितांबर तायवाडे यांनी प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करुन पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सतत चर्चेत असतात. विधानसभा अधिवेशनातही नाना पटोले यांनी आक्रमक होत विरोधकांवर घणाघात केला होता. विरोधकांच्या प्रश्नांनाना आणि आरोपांना नाना पटोले यांनी सडेतोड उत्तर देत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाचे नाव कृणाल दहिवाले (वय ३४) असे आहे. हा तरुण एका सौंदर्य प्रसाधानाच्या एजन्सीमध्ये काम करत असून त्याने २७ फेब्रुवारी रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट लिहिली होती. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या तक्रारीनुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या पथकाने या तरुणाचा शोध घेऊन अटक केली आहे. तसेच न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तरुणाला जामिनावर सुटका केली आहे.

- Advertisement -

कृणाल दहिवाले याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली परंतु तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार भाजप आणि मोदींवर टीका करत असतात. पटोलेंनी अधिवेशनात राम मंदिर वर्गणीवरुन भाजप आणि केंद्राला चांगलेच फटकारले होते. त्यामुळे विरोधकांनी नाना पटोलेंना निशाणा करत टीकेची झोड उठवली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -