घरताज्या घडामोडीनाट्यगृहं-चित्रपटगृहं १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास सरकारला नेमकी अडचण काय ? अमेय...

नाट्यगृहं-चित्रपटगृहं १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास सरकारला नेमकी अडचण काय ? अमेय खोपकरांचा सवाल

Subscribe

५० टक्के क्षमेतेने चित्रपटगृहे सुरू असताना देखील पांडू, झिम्मा सारख्या सिनेमांनी करोडोंची कमाई केली. जर १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू केल्यास मराठी चित्रपट आणि नाटक आणखी जोरात चालतील.

मागील दोन वर्षांपासून कोरोन महामारीमुळे सर्व क्षेत्रांवर निर्बंध आले होते. कोरोना महामारीचा सर्वात जास्त फटका हा सिनेसृष्टीला बसला. सर्वकाही सुरळीत सुरू झाल्यानंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे केवळ ५० टक्क्यांनी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ? असा सवाल मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सरकारला विचारला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत राज्यसरकारवर निशाणा साधत सरकारला आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलेय, ‘आता बास्स… सहनसक्तीचा अंत झाला. मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. मॉल्स, पब्ज, रेस्टॉरंट्स सगळं काही पूर्ववत झाले आहे. मग आता नाट्यगृहे चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ?’

- Advertisement -

कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना अनेक मराठी चित्रपट आणि नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ५० टक्के क्षमेतेने चित्रपटगृहे सुरू असताना देखील पांडू, झिम्मा सारख्या सिनेमांनी करोडोंची कमाई केली. जर १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू केल्यास मराठी चित्रपट आणि नाटक आणखी जोरात चालतील.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या आता पाचशेच्या घरात आली आहे. पॉझिटीव्ही रेट घटला असून रिकव्हरी रेट वाढला आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या आता मोठ्या प्रमाणात घटली आहे. चित्रपटगृहांमध्ये देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांची काळजी घेतली जाते. त्यामुळे आता चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास काहीही हरकत नाहीये. अमेय खोपकर यांनी सरकारला विचारलेल्या प्रश्नानंतर राज्य सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा –  Oscar 2022: ऑस्कर २०२२च्या नॉमिनेशनची आज घोषणा, ‘या’ चित्रपटांकडून भारताला अपेक्षा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -