उल्हासनगर मध्ये मोबाईलच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करणाऱ्या २ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . दुकानात असलेल्या सीसी टीव्ही फुटेजमुळे हे चोर पकडले गेले असून त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल व अन्य मुद्देमाल जप्त केला आहे . उल्हासनगर – ४ येथील नेताजी चौकामध्ये अजय टेली नेटवर्क या नावाचे मोबाईलचे दुकान आहे . १ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाच्या छतावरील पत्रा फोडून दोन चोरांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही चोरांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. या चोरांनी दुकानातील ९ मोबाईल फोन्स, मोबाईल चार्जर , पॉवर बँक असा एकूण २६ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करून लंपास केला.
मोबाईलच्या दुकानात चोरी; सीसीटीव्ही फुटेजवरून २ आरोपी ताब्यात #MyMahanagar
आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 4, 2019
फुटेजवरून २ आरोपी ताब्यात
या प्रकरणी अजय टेली नेटवर्क या दुकानाच्या मालकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात चोरांविरूद्ध तक्रार नोंदवली होती . पोलिसांनी यावेळी पंचनामा करून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले . दरम्यान २ मुले मोबाईल विकण्यासाठी एका ठिकाणी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी यावेळी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी हेच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. फुटेजमधील आरोपी लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता अखेर त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.