घरमहाराष्ट्रदगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर हा त्यांचा प्रश्न

दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर हा त्यांचा प्रश्न

Subscribe

दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावला.

दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांकडून शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पवार म्हणाले की, दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर हा त्यांचा प्रश्न आहे. सर्व सत्ता केंद्रित करून ठेवत दोघांनीच सरकार चालवायचे ठरवल्याचे दिसत आहे. ते सत्ताधारी आहेत. ते काय करतात करू द्या. आम्ही विरोधी पक्षात आहोत, असे उत्तर पवार यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

शिंदेंना आधीही झेड सिक्युरिटी आणि आताही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांना सुरक्षा नाकारण्यात आल्याच्या मुद्द्याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, राज्य सरकारने कोणाला सुरक्षा द्यायची किंवा नाही द्यायची यासंदर्भातील निर्णय कॅबिनेटमध्ये होत नाहीत. ही चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्याची शिफारस मुख्य सचिव, गृहसचिव अशा सीनियर अधिकार्‍यांच्या एका कमिटीकडे केली जाते. त्यानंतरच सुरक्षा प्रदान करण्यासंदर्भातील निर्णय घेतले जातात.

आजच सकाळी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आणि माझी भेट झाली. या भेटीदरम्यान वळसे-पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी याआधीही होती आणि आताही आहे. याशिवाय गडचिरोलीचे काम त्यांच्याकडे असल्याने त्यासाठी अ‍ॅडिशनल फोर्स त्यांना दिली होती. हे माजी गृहमंत्र्यांकडून ऐकले. त्यामुळे यावर अधिक चर्चेची गरज वाटत नाही. दोघांनी मिळून सत्ता चालवायचे ठरले आहे. त्यामुळे जे काही करतील ते स्वीकारायला हवे, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

बाबासाहेब पुरंदरेंवर पुन्हा टीका
पुण्यातील एका पुस्तक कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर पुन्हा टीका केली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबत अर्धवट माहिती दिली. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो. श्रीमंत कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबत अर्धवट माहिती दिली.

भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचे राज्य, अशोकाचे राज्य, यादवांचे राज्य होते, पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य यापासून वेगळे होते. कारण त्यांचे राज्य कधी भोसल्यांचे राज्य झाले नाही. ते रयतेचे राज्य म्हणूनच ओळखले गेले. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा, संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण श्रीमंत कोकाटेंनी सत्य मांडले, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी इंग्लंडला गेलो होतो. तेव्हा तिथे ग्रँड डफचे चार खंड विकत आणले. महाराष्ट्रात काही ग्रंथ खूप खपले. घराघरात ठेवले गेले. त्या ग्रंथांमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रंथाचा समावेश होतो. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणी केला नाही, मात्र श्रीमंत कोकाटे यांनी खरा इतिहास लिहिला आहे. संसदेचे अधिवेशन संपले की मी या इतिहास संशोधकासोबत बैठक घ्यायला तयार आहे. वस्तुनिष्ठ इतिहास समोर येण्यासाठी प्रयत्न करायला तयार आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

…म्हणूनच मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. राज्यातील शिंदे सरकार बेकायदेशीर पद्धतीने तयार झाल्याची लोकांची धारणा असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार चालणार नाही म्हणूनच भाजपने आपल्या मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात भाजप आपल्या मनावर ठेवलेला हा मोठा दगड कधी दुसर्‍याच्या गळ्यात बांधून कुणाला बुडवेल हे लवकरच पाहायला मिळेल, असा टोला पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -