…तर सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे निवडून येतील, रोहित पवारांचा दावा

मध्यावधी निवडणुका लागल्यास आम्ही तयार आहोत, असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. जर या निवडणुका लागल्या तर, आमचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ते सध्या कर्जत दौऱ्यावर आहेत.

Wildlife Crime Control Branch to be set up ncp mla rohit pawar demand to state government

बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. मात्र, हे सरकार अल्पकाळात कोसळेल असा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. तसेच, राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे संकेतही देण्यात येत आहेत. दरम्यान, मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. (… then most of the MLAs will be elected by the NCP, claims Rohit Pawar)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागू शकतात असे संकेत दिले आहेत. तसेच, उद्धव ठाकरे यांनीही मध्यावधी निवडुका लागू शकतात असं म्हटलं आहे. शिवसेनेसोबत बंडखोरी केलेलेल्या आमदारांवर ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना अपात्र ठरवलं तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकातात, असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. दरम्यान, मध्यावधी निवडणुका लागल्यास आम्ही तयार आहोत, असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. जर या निवडणुका लागल्या तर, आमचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ते सध्या कर्जत दौऱ्यावर आहेत.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

निवडणुका लागू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मात्र, एखादा विषय चिघळल्यानंतर तो कोर्टात गेला तर निवडणुका घ्याव्याच लागतील, त्यावेळी सर्वांत जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडणून येतील, गेल्या निवडणुकात काही फरकाने पराभूत झालेले आमदार निवडून येतील, तसेच, आमच्या आमदारांचे मताधिक्यही वाढलेले दिसेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.