घरमहाराष्ट्र...तर 11 तारखेला माझं पण जय श्रीराम झालं असतं : मनीषा चौधरी

…तर 11 तारखेला माझं पण जय श्रीराम झालं असतं : मनीषा चौधरी

Subscribe

इतके मोठे खड्डे पडलेले आहेत की पावसामध्ये खड्डे दिसत नाहीत. खड्डा दिसला नसला कारणानं जागेवरच टायर फुटला. त्याचबरोबर अनेक गाड्या पंक्चर होतायत. तर आयआरबी कसला टोल वसूल करते, असा सवालही मनीषा चौधरी यांनी उपस्थित केलाय

मुंबईः काल माझ्या मतदारसंघात बोरिवलीच्या नॅशनल पार्कवरती दोन जणांचा बाईकवाल्यांचा डंपरचा धक्का लागून अपघात झाला, दोन्ही जण जागेवरच गेले. पालघर जिल्हयातील अहमदगाबाद हायवे आहे. याची परिस्थिती आपण बघाल तर 11 तारखेला माझं पण जय श्रीराम झालं असतं, असं दहिसरच्या भाजपच्या आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या आहेत. भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी विधानसभेच्या सभागृहात राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरूनच स्वतःच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्या विधिमंडळाच्या सभागृहात बोलत होत्या.

इतके मोठे खड्डे पडलेले आहेत की पावसामध्ये खड्डे दिसत नाहीत. खड्डा दिसला नसला कारणानं जागेवरच टायर फुटला. त्याचबरोबर अनेक गाड्या पंक्चर होतायत. तर आयआरबी कसला टोल वसूल करते, असा सवालही मनीषा चौधरी यांनी उपस्थित केलाय.

- Advertisement -

आयआरबी टोल वसूल करत असल्यानं त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी सगळे खड्डे तातडीने बुजवायला पाहिजेत. मुंबईतही एमईपीने खड्डे बुजवायला पाहिजेत, या दोन्ही टोल कंपन्यांवर तुम्ही काय कारवाई करणार दहिकाला उद्या आहे, अनेक पथकं येणार आहेत, अपघात होऊ शकतात, तर तातडीने आपण खड्डे भरणार का हा माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे, असं मनीषा चौधरींनी विचारणा केली असता त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही उत्तर दिल्लीय. मनीषा ताईंनी सांगितलं आहे, त्याप्रमाणेत सगळ्यांना डायरेक्शन दिलं जाईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणालेत.

विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून रणकंदन माजलंय. “मुंबई-गोवा महामार्गावरील ठाणे ते बेलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक अपघात घडत असून, यामध्ये प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर निवेदन काढावे”, असे सुनील प्रभूंनी म्हटले. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम रविंद्र चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ च्या अखेरीस पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.

- Advertisement -

हेही वाचाः ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी’, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची पोस्टरबाजी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -