Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "..तर लोकांचा मविआवर विश्वास राहणार नाही", छगन भुजबळांचा नेत्यांना सल्ला

“..तर लोकांचा मविआवर विश्वास राहणार नाही”, छगन भुजबळांचा नेत्यांना सल्ला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना सल्ला दिला आहे. मविआतील नेत्यांनी बोलताना एकमेकांच्या विरोधात शेरेबाजी करणे टाळले पाहिजे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

महाविकास आघाडीत गेल्या काही महिन्यांपासून आपापसांत वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आघाडीतील नेतेच एकमेकांच्याविरोधात कुरघोड्या करताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये कायमच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. त्यामुळे याचा परिणाम महाविकास आघाडीच्या एकजुटीवर होण्याची शक्यता अनेकदा वर्तविण्यात येत असते. ज्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना सल्ला दिला आहे. मविआतील नेत्यांनी बोलताना एकमेकांच्या विरोधात शेरेबाजी करणे टाळले पाहिजे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – “मोदी सरकार इतिहास नष्ट करतंय…”; संजय राऊतांचा आरोप

- Advertisement -

“बोलताना एकमेकांच्या विरोधात शेरेबाजी करणे टाळले पाहिजे. जर आपल्याला एकत्रित लढायचं आहे तर आपल्यामध्येच अशा प्रकारची फूट आहे, असे जनतेमध्ये त्याचा प्रचार-प्रसार झाला, तर आपल्या महाविकास आगाडीच्या एकजुटीवर वज्रमुठीवर लोकांचा विश्वास राहणार नाही. त्यामुळे मविआच्या सर्वच नेत्यांनी सांभाळून बोलावे,” असा सल्ला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच थुंकण्याची ॲक्शन केली. त्यांनंतर राज्यातील अनेक राजकारण्यांनी याबाबद्दल संताप व्यक्त केला. तर पक्षाच्या नेत्यांनी तार्तम्य बाळगावे आणि आपले मत व्यक्त करावे, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. अजित पवारांच्या या मताला प्रतित्युत्तर देत संजय राऊत म्हणाले की, धरणामध्ये xxxपेक्षा थुंकणं चांगलं अशी खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे या टीकेवरून आता दोघांमध्ये पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जागा वाटपांबाबत चर्चा करणे टाळावे..

- Advertisement -

महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपांच्या चर्चांवरून धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांकडून जागा वाटपांच्या संदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे जागा वाटपांसदर्भात जो काही निर्णय आहे, तो मविआचे नेते बैठकीच्या माध्यमातून घेतील. म्हणून प्रसार माध्यमांसमोर याबाबत चर्चा करणे टाळावे, असा आणखी एक सल्ला छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -