Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र '..मग मंदिरांना प्रोटोकॉल नाही का?; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवारांचा राज्य सरकारला...

‘..मग मंदिरांना प्रोटोकॉल नाही का?; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवारांचा राज्य सरकारला सवाल’

महाराष्ट्राभरातील मंदिर बंद असल्यानं राज्य सरकारवर मंत्री भारती पवारांचा निशाणा

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माध्यमाशी संवाद साधला. या वेळी भारती पवार यांनी आरोग्य सेवक नेमणूक, आरोग्य व्यवस्था, महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याबाबत तसेच कोरोना व्हारसची तिसरी लाट आणि महिला सुरक्षा आदी विषयावर सवांद साधला .या वेळी भारती पवार यांनी महाराष्ट्राभरातील मंदिर बंद असल्यानं राज्य सरकारवर निशाणा साधला.

बार सुरू होतात मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? कमी लोकांमध्ये मंदिर उघडण्यास काही हरकत नसून. राज्याने मंदिर उघडण्यासदंर्भात केंद्रसरकार वर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घ्यावा असं मंत्री भारती पवार माध्यमाशी संवाद साधतांना म्हणाल्या. कोरोणाजन्य परिस्थितीत कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नये, असं भारती पवार म्हणाल्या.

- Advertisement -