…तर शिवसेनेच्या शाखांना टाळं लावायलाही माणसं उरणार नाहीत, ठाण्याच्या माजी महापौरांचा घणाघात

ठाणे शहरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक अधिक असल्याने ठाण्यातील सर्वाधिक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

meenakshi shinde and uddhav thackeray

ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेच्या शाखांना टाळा लावायलाही माणसं उरणार नाहीत, असं मिनाक्षी शिंदे म्हणाल्या आहेत. ठाणे शहरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक अधिक असल्याने ठाण्यातील सर्वाधिक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. (… then there will be no people left to locked the Shiv Sena branches, former Thane mayor)

हेही वाचा पक्षविरोधी कारवाई भोवली, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पक्षविरोधीत कारवाया करत असल्याचा आरोप करत नुकतंच मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी पक्षावरील राग व्यक्त केला. नाराजी व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, ‘शिवसेनेतील नेते अजून किती पदाधिकाऱ्यांना पक्षातून हकालपट्टी करणार आहेत? पक्षातून कार्यकर्त्यांना काढण्याचं सत्र असंच सुरु राहिलं तर शिवसेना शाखांना टाळं लावायला माणूस उरणार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया शिंदे समर्थक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा – राज्यपालांनी बोलावलेलं विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीच पक्ष संपवायला घेतला आहे. म्हणूनच त्यांनी आमची पदे काढून घेतली. मात्र, आमचे शिवसैनिक पद कोणीच काढून घेऊ शकत नाही, असंही त्याही पुढे म्हणाल्या.

हेही वाचा – उद्धवसाहेब दुखावले नाही पाहिजेत, दीपक केसरकरांनी व्यक्त केली भावना

ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा दबदबा आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीला ठाण्यातूनच सुरुवात झाली होती. त्यामुळे ठाण्यात शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारताच नरेश म्हस्के यांनीही जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांचे उघड समर्थन केल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.