घरताज्या घडामोडी...तर हे सरकार ५ वर्ष चालेल - अजित पवार

…तर हे सरकार ५ वर्ष चालेल – अजित पवार

Subscribe

आज पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर महिन्याभरानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या महिन्याभराच्या कालावधीत राज्यातील राजकारणात अनेक उलथापालथ करणाऱ्या घटना घडल्या. त्या सर्व घटनांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आघाडीवर होते. दरम्यान आज पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. “सत्ता आली म्हणून शिरजोरी करु नका,” असे सांगत “तिनही पक्षांनी वाद टाळले तर हे सरकार ५ वर्ष चालेल,” असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केले.

काय म्हणाले अजित पवार?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या सरकारची स्थापना झाली आहे. यावर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, “सत्ता आली म्हणून शिरजोरी न करता तिनही पक्षांनी वाद टाळले तर हे सरकार ५ वर्ष चालेल.” ते पुढे म्हणाले की, “ज्या जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री होईल असे सांगतानाच राष्ट्रवादीला आणखी एक खाते मिळण्याबाबतचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.”

- Advertisement -

अजित पवार नाराज?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यावेळी अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे खुद्द अजित पवार यांनी सततच्या बैठकींना कंटाळून भाजपसोबत सत्तास्थापनेचा निर्णय घेतल्याचे त्यावेळी स्पष्ट केले होते. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पहिल्यांदाच अजित पवार कार्यकर्त्यांशी दिलखुलासपणे संवाद साधताना दिसले.

अजित पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • निकालानंतर महिनाभर बऱ्याच गोष्टी घडल्या
  • विकासकामांमध्ये सातत्य टिकलं पाहिजे
  • पेपरच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका
  • राष्ट्रवादीला अजून एखादं खातं मिळू शकतं
  • गृहखात्यासंदर्भात अजितदादांच सूचक वक्तव्य
  • जनतेतून सरपंच निवड अडचणीची
  • बॉडी वेगळी आणि सरपंच वेगळा असं होतंय.
  • कामांची घडी बसवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील
  • थेट सरपंचपद बदलण्याचे अजितदादांचे संकेत
  • आघाडीला विश्वासात घेवूनच बदल करु
  • आपल्या माणसांचा आपणच मान ठेवा
  • सत्ता आली म्हणून लगेच शिरजोरी करु नका
  • तिन्ही पक्षांनी वाद टाळले तर सरकार ५ वर्ष चालेल
  • ज्या जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -