Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीयेवल्यात काँटे की टक्कर,तिसर्‍या फेरीअखरे भुजबळ ८६ मतांनी आघाडीवर 

येवल्यात काँटे की टक्कर,तिसर्‍या फेरीअखरे भुजबळ ८६ मतांनी आघाडीवर 

Subscribe
नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात महायुतीचे छगन भुजबळ हे सुरुवातीला आघाडीवर होते.नंतर ते पिछाडीवर गेले तर तिसर्‍या फेरीअखेर भुजबळ यांनी ८६ मतांनी आघाडी घेतली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून येवला विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. महायुतीत अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येवला विधानसभेचा गड  छगन भुजबळ राखणार की माणिकराव शिंदे बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे. तर पहिल्या कलानुसार या मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली होती. मात्र, ईव्हीएम मतमोजणीत छगन भुजबळ पिछाडीवर गेले. माणिकराव शिंदे यांनी टपाली मतदानात 115 मतांनी आघाडी घेतली. तर दुसर्‍या फेरीत  छगन भुजबळ 1300 मतांनी पिछाडीवर होते. मात्र तिसर्‍या फेरीअखेर भुजबळ ८६ मतांनी आघाडीवर आहेत.
2004 पासून छगन भुजबळांचे येवल्यावर वर्चस्व
2004 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव केला होता. भुजबळ यांना 79 हजार 306 तर कल्याणराव पाटील यांना 43 हजार 657 मते मिळाली होती. 2009 मध्ये भुजबळ यांनी 1 लाख 6 हजार 416 मतं मिळवत शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. 2014 सालच्या निवडणुकीत 1 लाख 12 हजार मिळवत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. पवार यांना या निवडणुकीत 66 हजार 345 मते मिळाली. तर 2019 मध्ये भुजबळ यांनी पुन्हा शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना 1 लाख 26 हजार 237 मते मिळाली. तर पवार यांना 69 हजार 712 मते मिळाली होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -