डिसेंबर – जानेवारी महिन्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

रब्बीतील कांदा लागवडीची तयारी आता सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात प्रतिवर्षी खरीप आणि लेट खरीप हंगामात चार-साडेचार लाख हेक्टरवर कांदा लागवड करण्यात येते. पण यावर्षी अतिवृष्टीमुळे लागवडीखालील क्षेत्रात तब्बल अडीच लाख हेक्टरची घट झाली आहे. रब्बीतील कांदा लागवडीची तयारी आता सुरु झाली आहे. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमध्ये कांद्याचे भाव पाच हजारांवर जातील, असा अंदाज फलोत्पादन विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. (There is a possibility of a big increase in the price of onion in the month of December – January)

राज्यातील एकूण कांदा उत्पादनातील 70 टक्के उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यात होते. नाशिक पाठोपाठ अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. पण जुलै ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये सततचा पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कांद्याची रोपे वाया गेली आणि जमिनीतील ओलावाही कमी झाला नाही. त्यामुळे खरीप आणि लेट खरीपातील कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणावर घट झाली. मागील वर्षी खरीप आणि लेट खरीपात तीन लाख 59 हजार हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली होती. पण, यावर्षी मात्र केवळ एक लाख 19 हजार हेक्टरवरच कांद्याची लागवड करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरनंतर सुरु होणाऱ्या रब्बी हंगामात कांद्याची लागवड वाढेल, असा अंदाज फलोत्पादन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मागील वर्षी जवळपास दोन ते अडीच लाख टनपर्यंत कांदा शिल्लक असेल आणि बराच कांदा पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने कांद्याचे दार वाढतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या कांद्याचे दर प्रतिक्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहेत

कांद्याच्या लागवडीची सद्यस्थिती आणि खरीपातील लागवड

90,000 हेक्टर – लेट खरीपातील लागवड

29,000 हेक्टर – रब्बीतील अंदाज

4.50 लाख हेक्टर – सध्याचे प्रतिक्विंटल दर

2300 ते 2600 – ‘साठेबाजी’वर वेळेतच नियंत्रण

Onion rates
कांद्याची दरवाढ

सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर साठेबाजीवरसुद्धा लक्ष ठेवण्यात येईल असे फलोत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर वाढणार असल्याची माहिती ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळाली होती. सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या कंदाच्या पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. डिसेंबरमध्ये कांद्याची आवक होणार आहे. यामुळेच कांद्याची वाढणारी मागणी पाहता कांदा महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला याचा फटका बसणार आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकामधील हळवी कांद्याचेसुद्धा नुकसान झाले. याआधी पावसामुळे कांद्याचे नुकसान होत होते. पण यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने कांद्याच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बाजारात येणारा कांदा खराब झाला. दरम्यान नवीन हळवी कांद्याची लागवड सध्या सुरू आहे. हा कांदा बाजारात यायला नवे वर्ष उजाडणार आहे,’ अशी माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.


हे ही वाचा – चांगले निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; संजय राऊतांची प्रतिक्रिया