घरCORONA UPDATELockdown : देशातला लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता!

Lockdown : देशातला लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता!

Subscribe

येत्या काळात देशातील कोरोना प्रभावित अशा किमान सात राज्यामध्ये तरी लॉकडाऊनचा काळ वाढविण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता हा कालावधी संपण्यासाठी आठवड्याचा काळ शिल्लक राहिला आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हा उपाय अंमलात आणण्यात आला होता. परंतु, कोरोनाची दहशत अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे येत्या काळात देशातील कोरोना प्रभावित अशा किमान सात राज्यामध्ये तरी लॉकडाऊनचा काळ वाढविण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

२१ दिवसांचा लॉकडाऊनचा कार्यकाळ संपला तरी त्यापुढे ही परिस्थिती कायम राहणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यांनी त्यांच्या राज्यातील ही परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन केले आहे. शिवाय महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड, झारखंड या राज्यात लॉकडाऊन काळ आणखी काही दिवसांनी पुढे जाऊ शकण्याला आणि पूर्णपणे नियम शिथिल न करण्याचा निर्णयाला स्वागत केलं.

- Advertisement -

दुसरीकडे आसाममध्ये आतापर्यंत २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असले तरीही त्यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णयाला दुजोरा दिला. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून, मुंबई आणि पुणे या भागांमध्ये लॉकडाऊनचे नियम आणखी काही दिवस लागू असतील. योगी आदित्यनाथ यांनीही लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात टप्पे असण्याचा विचार मांडला आहे. देशात वाढणारा एकंदर कोरोना रुग्णांचा आकडा पाहता लॉकडाऊनवाचून पर्याय नसल्याची बाब एकमताने समोर येत आहे. याबाबत केंद्राकडून अद्यापही अधिकृत घोषणा झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -