घरदेश-विदेशदेशात करोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही

देशात करोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही

Subscribe

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात करोनाचा रिकव्हरी रेट 49.2 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले, की बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षाही अधिक झाली आहे. करोनाचा रिकव्हरी रेटही चांगला होत आहे. तर आयसीएमआरने म्हटले आहे, की भारतात अद्याप कम्युनिटी ट्रान्समिशन झालेले नाही.

पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आपण नेहमीच ज्या देशांची लोकसंख्या आपल्या एवढी आहे, त्याच देशांशी तुलना करायला हवी. ज्या देशांची लोकसंख्या आपल्या पेक्षा कमी आहे, त्यांच्याशी आपण तुलना करू शकत नाही.

- Advertisement -

प्रति लाखचा विचार केल्यास आपल्या देशात करोना रुग्ण कमी आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यू दरही फार कमी आहे. आम्ही 83 जिल्ह्यांत सर्व्हे केला. यात लॉकडाऊन यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनमुळे करोनावर नियंत्रण मिळवता आले. मात्र आताही सर्वांनी मास्कचा वापर करणे , हात धुणे आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. वृद्ध आणि लहान मुलांना करोनाचा धोका अधिक आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, गावांच्या तुलनेत शहरांमध्ये अधिक रुग्ण आढळून येत आहेत. हा सर्व्हे 24 हजार लोकांवर करण्यात आला. देशभरातील अनेक जिल्ह्यांत एप्रिलच्या अखेरीस असलेल्या स्थिती संदर्भात हा सर्व्हे करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -