साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेशच नाहीत, किरीट सोमय्यांचा दावा ठरला फुसका

जाणूनबुजून सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावून बदनामी करत आहेत. तपास यंत्रणांना माझा विरोध नाही. त्यांना हवी ती सर्व माहिती मी दिलेली आहे. यापुढेही तपासात सहकार्य करू, असंही अनिल परब यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

sai resort officials reveal the wrong information given by kirit somaiya in the sai resort case

रत्नागिरी – सीआरझेडच्या मुद्द्यावरून दापोलीतीली साई रिसॉर्ट पाडण्यात येणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने सी कॉच हॉटेल पाडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आपला बनाव उघडकीस येताच, किरीट सोमय्या यांनी मुरूडमधून काढता पाय घेतला.

हेही वाचा – ‘त्या’ शेतकर्‍यांचीच होणार भातखरेदी

माजी मंत्री अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत साई रिसॉर्ट बांधले असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत हे रिसॉर्ट पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. दरम्यान, मंगळवारी साई रिसॉर्ट पाडणार असल्याची आवई उठवत किरीट सोमय्या मंगळवारी दापोलीत दाखल झाले. त्यांनी प्रतिकात्मक हातोड्याचे घाव जमिनीला घालत आंदोलनही केले. पंरतु, साई रिसॉर्ट पाडण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. तसंच, सी कॉच हॉटेलचे बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आल्याचंही विभागाने स्पष्ट केलं.

केळशीपासून दाभोपळपर्यंतच्या साधारण ३५ किमी अंतरावर समुद्रकिनापट्टीवरील जवळपास सर्वच हॉटेलचे बांधकाम सीआरझेडचे उल्लंघन करून करण्यात आले आहेत. त्यामुळे साई रिसॉर्टवर कारवाई झाल्यास या इतर हॉटेल्सवरही कारवाई होणार असल्याची भिती सध्या हॉटेल व्यावसायिकांत आहे. त्यामुळे कोकणातील उभे राहिलेले पर्यटन समूळ नष्ट होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – भूखंडासाठी नाममात्र भाडे आकारणीच्या नियमात सुधारणा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सोमय्यांविरुद्ध फौजदारी दावा करणार

साई रिसॉर्ट प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने माझी बदनामी करत आहेत. मी सोमय्यांविरोधात यापूर्वी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, मात्र आता मी फौजदारी दावादेखील दाखल करणार आहे. मी क्रिमिनल रिट पिटिशन फाईल करणार असल्याचे माजी मंत्री आमदार अनिल परब यांनी सांगितले. सोमय्यांना त्यांच्या पक्षात कुणीही विचारत नसल्याने त्यांची नौटंकी सुरू आहे. साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. ही मालकी त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेली आहे. महसूल विभागाच्या सर्व कागदपत्रांत त्यांचे नाव आहे. ज्या नोटिसी आलेल्या आहेत, त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. मात्र जाणूनबुजून सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावून बदनामी करत आहेत. तपास यंत्रणांना माझा विरोध नाही. त्यांना हवी ती सर्व माहिती मी दिलेली आहे. यापुढेही तपासात सहकार्य करू, असंही अनिल परब यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.