Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे. पण..."; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

“सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे. पण…”; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Subscribe

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळत आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाला असून 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. लंडन दौऱ्यावर गेलेले राहुल नार्वेकर हे आता पुन्हा मुंबईत दाखल झाले असून या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे त्यांच्याकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे. पण 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळत आहे. “पोपट मेला आहे..” या वाक्यावरून विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकांना टोला लगावताना दिसत आहेत. सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. असे म्हणत राऊतांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फडणवीसांवर टीका केली आहे. (“There is only one wise man in government. But…”; Sanjay Raut’s attack on Fadnavis)

हेही वाचा – शिंदेंचा पोपट मेलाय फक्त अध्यक्षांनी जाहीर करणं बाकी; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

- Advertisement -

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “मी यावर काहीही बोलू शकत नाही. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे. पण एक अभ्यासक, एक वकील आणि 25 वर्षे विधानसभेत कार्य केलेली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की, आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं समजलं आहे की, पोपट मेला आहे. तरीही ते अशा गोष्टी बोलत आहेत. कारण साहजिकच त्यांना कार्यकर्त्यांना दाखवावं लागणार की आशा जिवंत आहेत.”

पण त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. “सर्वोच्च न्यायालयानं मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलंय. पोपट मेलाच आहे. फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचंय. मला वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी सगळे अतीशहाणे किंवा मूर्ख आहेत. देवेंद्र फडणवीसच असं म्हणत असतील, तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील,” असे म्हणत राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

- Advertisement -

संजय राऊत आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सरकारवर आरोप केला आहे की हे सरकार माझ्या दौऱ्यादरम्यान होणाऱ्या पत्रकार परिषदेबाबत आता पत्रकारांवर दबाव आणत आहे. त्यांच्यावर काही ठराविक प्रश्न विचारण्याचा दबाव आणला जात आहे, असं म्हणत सरकारवर आरोप केला आहे.

- Advertisment -