घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात आधीपासूनच अलिखित युती होती; खडसेंचं खळबळजनक विधान

एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात आधीपासूनच अलिखित युती होती; खडसेंचं खळबळजनक विधान

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात आधीपासूनच अलिखित युती होती, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड यशस्वी होऊन महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळल्याने राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाकडून शिंदे गटाविरोधात नाराजी व्यक्त केली जातेय. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात आधीपासूनच अलिखित युती होती, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. (There was already an unwritten alliance between Eknath Shinde and the BJP, Khadse’s sensational statement)

हेही वाचा पाठीत वार कुणी केला? राऊत-राणे यांच्यात ट्विटर वॉर

- Advertisement -

एकनाथ खडसे म्हणाले की, शिंदे आणि भाजप यांच्यात अलिखित छुपी युती होती. सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केले. त्यामुळे त्यांचा निर्णय पूर्वीपासून भाजप सोबत जाण्याचा होता. आजपर्यंतचा इतिहास आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली नाही.

हेही वाचा आता आपले मार्ग वेगळे, संजय राऊतांनी बंडखोर शिंदे गटाला स्पष्टच सांगितलं

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, जळगावात गुलाबराव पाटलांवर कधीही गिरीश महाजनांनी टीका केली नाही. शिवसेना हा गटारातल्या बेडकासारखा पक्ष आहे असंही गिरीश महाजन म्हणाले होते पण तरीही गुलाबरावांनी काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. याच्यावरून लक्षात येतं की भाजपबरोबर जायचा विचार एकनाथ शिंदेचा आजचा विचार नव्हता तो फार आधीपासूनच विचार होता.

हेही वाचा राज्यपालांनी बोलावलेलं विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या विश्वासदर्शक ठरावाला हिरवा कंदील दाखवला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी समाज माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला. बहुमत चाचणीचा खेळ खेळायचा नाही असे स्पष्ट करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. ही घोषणा करताना ठाकरे यांनी बंडखोरांना आपल्या शैलीत सूनवताना राज्यपालांचे नाव न घेता त्यांना टोले लगावले. मी आता शिवसेना भवनात बसणार आहे. एका नवीन शिवसेनेची उभारणी परत नव्या जोमाने करणार असल्‍याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. राजीनाम्याची घोषणा करताना उद्धव ठाकरे भावनिक झाले होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -