मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये फूट पडलेली असेल, अशी भविष्यवाणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना एनडीए, सनातन धर्म, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार अपात्रतेप्रकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. भाजपच्या नेतृत्वाखील सध्याचे एनडीए ही एक नौटंकी आहे, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला.
एमआयडीएमके हे एनडीएमधून बाहेर पडले, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “भाजपच्या नेतृत्वाखील सध्याचे एनडीए ही एक नौटंकी आहे. इंडिया निर्माण झाल्यानंतर पाटणा आणि बेगंलुरूमध्ये बैठका झाल्या. यानंतर भाजपला एनडीएची आठवण झाली नाही तर तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झालेली नव्हती. मग भाजपने इकडून तिकडून लोक गोळा केली आणि दिल्लीमध्ये एनडीएम म्हणून बैठक घेतली. एनडीएमध्ये कोण आहेत. जर शिवसेना आणि अकाली दल नसेल. तर ती एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकद ही शिवसेना आणि अकाली दल होती. शिवसेनाच नाही आहे. मग बाकीचे लोक येतात आणि जातात. एनडीए अस्तित्वात नाही. एनडीए ही एक नौटंकी आहे. एनडीएमध्ये तुम्हाला आज जे काही चित्र दिसत आहे. ते लोक देखील राहतात की नाही याबद्दल मला शंका आहे. किंबहुना मी तुम्हाला सांगतो की, 2024च्या आधी भाजप देखील फुटलेला असेल.
हेही वाचा – विधिमंडळाच्या काळ्या कुट्ट इतिहासातील एक पान त्यांच्या नावावर लिहिले जाईल – संजय राऊत
पंतप्रधानांना अचानक सनातन धर्माची काळजी वाटू लागली
इंडियाने सनातन धर्मला मूळापासून नष्ट करण्याची भूमिका आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “सनातन धर्मला कोणी मुळापासून नष्ट करू शक्त नाही. एआयडीएमके ही तुमच्यासोबत होती. एआयडीएमकेचा मुद्दा देखील सनातन धर्माच्या विरोधात आहे. सनातन धर्म हा देशात आणि जगात राहणार आहे. आम्ही सर्व जण सनातन धर्माच्या मजबूतीसाठी काम करतोय आणि करत राहणार आहोत. पंतप्रधानांना सनातन धर्माबद्दल काळजी करण्याची गरज नाही. भाजपने सनातन धर्माच्या निर्माणाचा आणि संरक्षणाचे ठेका नाही घेतला. येथे शिवसेना बसलेली आहे. आम्ही काम करत आहोत. सनातन धर्माची रक्षा करण्यासाठी आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. यासाठी मोदींची गरज नाही. हा निवडणुकीचा मुद्दा नाही. आतापर्यंत तुम्हाला सनातन धर्माची काळजी नव्हती. आता अचानक काळजी वाटू लागली. सोडून द्या.
हेही वाचा – सुप्रियाताई, तुम्ही कोणत्या परंपरेच्या वाहक आहात? शरद पवारांचा व्हिडीओ शेअर करत भाजपाचा पलटवार
निवडणुकीसाठी अनेक मुद्दे
सनातनधर्मचा मुद्दा हा २०२४मधील निवडणुकीसाठी अजेंडा तयार केला जातोय का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “2024मध्ये मोदींकडे कोणते मुद्दे नाहीत. महागाई, बेरोजगारी, चायनाची घुसखोरी हे मुद्दे आहेत. जम्मू-काश्मीर, कॅनडा, हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत.”
हेही वाचा – एखाद्या पूरग्रस्ताचे तोंड तात्पुरते बंद करू शकाल, पण…; ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा
खासदारांनी काम केली नाही
लोकसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशमध्ये भाजपची यादी बाहेर आलेली आहे. आत 28 पैकी ३ जणांना खासदारांना उमेदवारी देण्यात येणार आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. त्या लोकांनी काही काम केले नसेल. त्यांना चांगले काम केले असते. तर त्यांना तिकीट मिळाले असते.