घरताज्या घडामोडीअतिरिक्त प्रवास भाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर कारवाई होणार - परिवहनमंत्री

अतिरिक्त प्रवास भाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर कारवाई होणार – परिवहनमंत्री

Subscribe

खाजगी बसेसकडून जर अधिकचे प्रवास भाडे घेण्यात येत असेल, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले.

राज्यात करोना विषाणू (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा, महाविद्यालय व खाजगी कंपन्या यांनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी जेथे अधिक बसेस सोडण्याची आवश्यकता आहे. तेथे त्यानुसार त्वरित प्रवाशांची संभाव्य गैरसोय दूर करण्याच्या सूचना एसटी महामंडळाला देण्यात आल्या आहेत. परंतु खाजगी बसेसकडून जर अधिकचे प्रवास भाडे घेण्यात येत असेल, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले.

अनिल परब म्हणाले की, काही खाजगी कंपन्यानी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी, इतर प्रवाशी गावी जात आहेत. या काळात खाजगी बस सेवांनी अधिकचे प्रवास भाडे घेतल्याचे निदर्शनास आले. तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. खाजगी बस सेवांनी सामाजिक बांधिलकीतून योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करून सहकार्य करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -