घरमहाराष्ट्रम्हाडा सोडत प्रक्रियेत होणार मोठे बदल, अर्ज भरतानाच जमा करावी लागणार कागदपत्रे

म्हाडा सोडत प्रक्रियेत होणार मोठे बदल, अर्ज भरतानाच जमा करावी लागणार कागदपत्रे

Subscribe

मुंबई – म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच बदल करण्यात येणार असून यापुढे सोडतीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाइन जमा करावी लागणार आहे. कागदपत्रांशीवाय अर्ज करता येणार नाही. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरलेले सोडतीत समाविष्ट होतील. पात्रता निश्चित झाल्याने विजेत्यांना थेट देकार पत्र देण्यात येणार आहेत, असे अनेक बदल सोडत प्रक्रियेत करण्यात आले आहेत. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि प्रक्रिया पारदर्शक होईल, असा दावा करण्यात येत आहे. याबाबत प्रस्ताव मुंबई मंडळाने म्हाडा प्राधिकरणाला सादर केला आहे.

यामुळे प्रक्रिया बदलण्याचा निर्णय –

- Advertisement -

म्हाडा सोडत आणि भ्रष्टाचार असे समीकरण असल्याची टीका सातत्याने होते. त्यामुळे म्हाडाने वेळोवेळी सोडत प्रक्रियेत बदल करून ती ऑनलाइन केली आहे. मात्र, यानंतरही भ्रष्टाचार सुरू असून सोडतीनंतरची प्रक्रिया अनेक वर्ष संपत नसल्याचे म्हाडाच्या निदर्शनास आले आहे. एखाद्याला घराचा ताबा देण्यासाठी १५-२० वर्षे लागत आहेत. प्रतीक्षायादी अद्याप कायम आहे. यामुळे म्हाडाने अखेर सोडतीची संपूर्ण प्रक्रियाच बदण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यानी दिली.

अशी असेल संपूर्ण प्रक्रिया –

- Advertisement -

एकूणच आतापर्यंत सोडतीसाठी काही ठरावीक कागदपत्रे लागत होती आणि सोडतीनंतर विजेत्यांवकडून उत्पन्नाचा दाखला, निवासाचा दाखला, आरक्षणानुसार जात प्रमाणपत्र इतर कागदपत्रे जमा करून घेत पात्रता निश्चित केली जात होती. पण आता अर्ज भरतानाच ही सर्व कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. त्यामुळे सोडतीआधीच पात्रता पूर्ण होणार असून विजेते ठरल्यानंतर पुढे थेट देकार पत्र देऊन विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेतली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांने सांगीतले.

सॉफ्टवेअर प्रणालीची आयआयटीकडून चाचणी –

नव्या सोडत प्रक्रियेसाठी म्हाडाकडून नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येत असून या प्रणालीची चाचणी आयआयटीकडून केली जाणार आहे. अर्जदारांना सोप्या पद्धतीने अर्ज भरता यावा यादृष्टीने या प्रणालीची रचना असेल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -