अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला बळीराजा रविवारी पावसामुळे सुखावला. अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयारो होण्याची शक्यता असल्यानं पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवाान विभागानं वर्तवली. 7 सप्टेंबरपर्यंत कोकण, गोव्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांनी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (There will be good rain in the next four-five days Met department forecast yellow alert for these districts)
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसानं राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. आज विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुण्यात आणि मुंबईतही आज पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
दरम्यान, मात्र पुढील 3 दिवस ( मंगळवार, बुधवार आणि गुरुवार) पुण्यात मुसधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढचे 3.4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 7 सप्टेंबरपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावेल अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवला आहे.
(हेही वाचा: मराठ्यांसाठी ‘राज’ मैदानात; जालन्यातील आंदोलकांची घेणार भेट )
29 जिल्ह्यांमध्ये सरासरापेक्षा कमी पाऊस
यंदा मान्सून सरासरीच्या 96 टक्के पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज सपशेल फोल ठरला आहे. पहिल्या तीन महिन्यांत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल 13 टक्के पाऊस कमी झाला. मराठवाडा व मध्य महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असून, विदर्भातील सर्व जिल्ह्यांत कमी पाऊस झाला. 29 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजूनही मोजके जिल्हे सोडले तर पुरेसा पाऊस झाला नाही.