मुंबई : “आमदार अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय देताना दिरंगाई करणार नाही”, असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीला होणाऱ्या विलंबवरून सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना फटकारले होते. यानंतर अध्यक्षांनी (ता. 25 सप्टेंबर) सुनावणी घेतली होती.
आमदार अपात्रतेप्रकरणाचा निकाल कधी लागणार आणि वेळापत्र जाहीर झाल्याची माहिती मिळली आहे, या प्रश्नावर राहुल नार्वेकर म्हणाले, “या याचिका न्यायाधीन आहेत आणि मी एक न्यायिक प्राधिकरण म्हणून तिथे काम करत आहे. असे असताना या विषयावर बोलणे उचित ठरणार नाही. पण मी ऐवढेच सांगू इच्छितो की, या याचिका ठरवित असताना कोणत्याही प्रकारची दिरंघाई केली जाणार नाही. परंतु, कोणत्याही प्रकारची घाई देखील केली जाणार नाही. यातून न्यायालयीच्या नियमाचे उल्लंघन केले होईल. आम्ही कालचा जो निकाल दिला आहे. त्याच्यात सुनावणी कशी होणार आहे. काय त्याची प्रक्रिया असणार आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती याचिकेतील सर्व पक्षकारांना दिली आहे आणि त्याचप्रमाणे ही कारवाई पुढे जाईल. मला खात्री आहे की लवकरच यासंदर्भातील निकाल देऊन. या विषयाला मार्गी लावू.”
हेही वाचा – सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊतांचे मोठे विधान
न्यायालयाचा मान राखला जाईल
आमदार अपात्रतेप्रकरणाचे वेळापत्र सर्वोच्च न्यायालयात कधी दिले, या प्रश्नावर राहुल नार्वेकर म्हणाले, “अध्यक्ष हे एक संविधानीक पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील आमदार अपात्रतेप्रकरणात योग्यती सूचना दिलेली आहे. न्यायालयाचा मान हा राखला जाईल. निश्चिचपणे अध्यक्षांची जी बाजू आहे. ती योग्यरित्या न्यायालयासमोर मांडली जाईल.”
हेही वाचा – “परदेशात जाण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योग परत आणा”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला
असे आहे वेळापत्रक
आमदार अपात्रतेप्रकरणी 13 ऑक्टेंबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तीवाद होणार असल्याची माहिती राहुल नार्वेकरांनी दिली. यासंदर्भात दोन्ही गटाच्या अध्यक्षांकडून प्रत पोहचली आहे. यानंतर 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात अपात्रतेसंदर्भात अंतिम सुनावणी होणार आहे, अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली आहे.
- 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान चालणार युक्तिवाद
- 23 नोव्हेंबर नंतर दोन आठवड्यात होणार अंतिम सुनावणी
- सर्व याचिका एकत्रित करण्यावर 13 ऑक्टोबरला सुनावणी
- अशी असेल आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी :
- १३ तारखेला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही? यावर सुनावणी पार पडेल
- १३ ते २० ऑक्टोबर दरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल
- २० ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल
- याशिवाय २० ऑक्टोबरला काही अधीकची कागदपत्र एखाद्या गटाला सादर करायची असतील तर त्यासाठी संधी दिली जाईल
- २७ ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं ( स्टेटमेंट) मांडतील
- ६ नोव्हेंबर पर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील
- १० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल
- २० नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल
- २३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल
- सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल