घरमहाराष्ट्रसरकारी नोकर भरतीत पारदर्शकता येणार; महामेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

सरकारी नोकर भरतीत पारदर्शकता येणार; महामेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Subscribe

शासकीय नोकर भरती करताना आधी खूप घोटाळे होत होते ते होऊ नयेत आणि मेहनत करून जो विद्यार्थीं प्रयत्न करत असेल त्यावर अन्याय होऊ नये म्हणून यात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाकडून शासकीय नोकर भरतीसाठी मुंबईत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 75 हजार तरुणांना या मेळाव्याच्या माध्यमातून शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. (There will be transparency in the recruitment of government employees; Assured by Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Maha Mela)

यावेळी फडणवीस म्हणाले, भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की, राज्यातील 75 हजार तरुण – तरुणींना शासकीय नोकऱ्या देण्यात येतील. खरंतर मागील 15 ते 20 वर्षांपासून शासकीय नोकर भरतीवर एक अघोषित बंदी आहे. शासकीय नोकराची मोजक्या जागा भरायच्या अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. कोणतीही गोष्ट करताना त्यात पारदर्शकता असली पाहिजे यामुळेच शासकीय नोकऱ्या सुद्धा पारदर्शकी पद्धतीने मिळाल्या पाहिजेत. म्हणूनच अनेक शासकीय नोकरीतील अनेक पदे ही एमपीएससीला दिली आहेत त्याचसोबत विभागाकडुन जी पदे भरायची आहेत. त्यामध्येही आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. शासकीय नोकर भरती करताना आधी खूप घोटाळे होत होते ते होऊ नयेत आणि मेहनत करून जो विद्यार्थीं प्रयत्न करत असेल त्यावर अन्याय होऊ नये म्हणून यात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बठकीत निवार्णाय घेण्यात आला की, देशामधील ज्या बेस्ट एजन्सी आहेत ज्यांना करोडो परीक्षा घेण्याचा रेकॉर्ड आहे आणि ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही. अशा एजन्सी शोधून त्यानच्याकडे हे काम द्यायचे हे करत असताना यात कोणत्याही प्रकारची कसर सोडायची नाही. हे काम अतिशय पारदर्शकाकतेने झाले पाहिजे. जेव्हा परीक्षा घेण्यात येईल तेव्हा कोणालाही या परीक्षेत हस्तक्षेप करता येणार नाही याची प्रमुखाने काळजी घेण्यात येणार आहे. यासोबतच याचे सातत्याने ऑडिट सुद्धा होईल असा विचार करवून मंत्रिमंडळात निणर्य घेण्यात आला.

टीसीएस आणि बँकांची परीक्षा घेणारी केंद्रसरकारची एजन्सी जिचा रेकॉर्ड सुद्धा अतिशय उत्तम आहे. ज्यामध्ये देशभरातून लेखक वेळी करोडो लोक परिसखा देत असतात पण त्याच्याकडून एकही चूक किंवा गडबड होत नाही. अशा दोन एजन्सीची नेमणूक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. त्यासंदर्भात एक समिती सुद्धा नेमण्यात आली आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करवून लवकरच सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठी येत्या वर्षभरात परीक्षा घेऊन नियुक्त्या करण्यात येतील. असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही नोकरभरती करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि योग्य पद्धतीने शासकीय नोकरभरती करण्यावर आमचा भर आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित केलेल्या रोजगार माळव्यात म्हटले.

- Advertisement -

दरम्यान या रोजगार मेळाव्याला भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला आणि उत्तम संदेश दिला त्याबद्दलही फडणवीस यांनी मोदींचे आभार मानले आणि त्यासोबतच शासकीय सेवेत येणाऱ्या नव्या पिढीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.


हे ही वाचा –  साडेतीन महिन्यांत ७२ मोठे निर्णय घेतले; रोजगार मेळाव्यात शिंदेंची माहिती

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -